डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे : अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे

0

नाशिक,दि. १५ एप्रिल २०२३ –विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे याचप्रमाणे नाशिक मध्ये आडगाव जत्रा परिसर कोणार्क नगर येथे त्रिरश्मी बुद्ध विहारांमध्ये जयंती मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वाला तारणारे आर्थिक विचार यावर  मार्गदर्शन करत होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून देशाला  मिळालेले  संविधान हि  खूप मोठी  देणगी आहे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे असे प्रतिपादन अर्थतज्ञ विश्वनाथ बोदडे यांनी केले.

जगभरामध्ये कोणतेही देशांमध्ये असे संविधान नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरामध्ये कोणता देश कोणत्या कारणांमुळे महासत्ता होऊ शकतो असे नमूद केलेले आहे, त्यामध्ये पहिले कारण दिले होते शस्त्रसाठा दुसरे कारण कच्च तेल तिसरं कारण  मेडिसिन आणि चौथे कारण दिलेले आहे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून त्यांनी नदीजोड प्रकल्प ची कल्पना ही खूप वर्षांपूर्वी दिलेली आहे आणि आज आपण बघत आहोत की जगभरामध्ये पाण्याचा तुटवडा आहे आणि भारतामध्ये ऑक्टोबर पर्यंत पाणी पडत असते  हेच पाणी आपल्या देशासाठी खूप मोठे वरदान ठरणार आहे याचा थरावर आपला देश हा सुजलाम सुफलाम होऊन जगामध्ये महासत्ता होणार आहे.असे बोदडे यांनी नमूद केले

त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये आर्थिक साक्षरता येणे खूप गरजेचे आहे कारण समाज विविध अंगांनी जरी कमाई करत असला तरी त्याचे नियोजन त्यांना जमत नसते अयोग्य खर्चांवर जर मर्यादा आणली तर निश्चित पुढील येणाऱ्या संकटांना मात करण्याची ससोटी आपल्याजवळ असू शकते आणि इतर समाजामधील जे चांगले सकारात्मक गुण आहे ते आपण अंगीकारले पाहिजे व आपण सुद्धा व्यवसायाकडे वळले पाहिजे असे सुद्धा त्यांनी नमूद केले

या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक उद्धव निमसे, खेताडे, संदीप  लभडे , बागुल काका गांगुर्डे ताई बीटी जाधव ,रामभाऊ संधान, रोहन साहेब ,आर के जगताप, रवींद्र जाधव ,समितीचे अध्यक्ष मिलिंद हिरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यकार भगवान हिरे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केदारे यांनी केले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!