‘नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात’-राज ठाकरे  

0

नाशिक,दि.२० मे २०२३ – दोन हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात हा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घेतले पाहिजे होते,असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.

नोट बंदीचा निर्णय हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. अशाने सरकार चालत का ? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी २ हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या,आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली.भारतीय चलनातून ५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी मोठी घोषणा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानंतर या नोटा चलनातून बाद केल्या केल्यात. आता दोन  रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याची घोषणा झाली आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता त्यात राज ठाकरे यांनी भर पडली आहे. त्यामुळे भाजपकडून काय आता प्रतिक्रिया येणार याचीही उत्सुकता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तब्बल २० महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये आलेत. दिवसभर बैठकांचं सत्र सुरु राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातला आढावाही घेत आहेत. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि  छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांच्या संघटनेच्या कामकाजाची ते माहिती घेणार आहेत.

इतका कमकुवत होणारा धर्म आहे का?
हा तिथल्या लोकांचा प्रश्न आहे. इतर धर्मांचा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्याइतका आपला धर्म कमकुवत आहे का? मी देखील अनेक दर्ग्यात गेलोय.तिथल्या लोकांनी हा निर्णय घ्यायचाय आहे. यात कुणाला दंगली हव्यात का?  गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे.चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाही.बहुसंख्य हिंदू राज्यात हिंदू खतरे मै है असं कसं होईल?,निवडणुका जवळ आल्या की हे सूचत,असे राज म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.