राज्यातील सत्तासंर्घषाची सुनावणी १ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली
दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले आहे.
नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे ठाकरे सरकार पडलं आणि राज्यात शिंदे सरकार आलं मात्र या सरकार विरोधात तसेच १६ आमदाराविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तसेच एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल चार याचिका दाखल केल्.या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली.अखेरीस न्यायालयामध्ये या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले आहे. या प्रकरणावर आता १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तसंच मंगळवारपर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आदेश दिले आहे.
या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. एकनाथ शिंदे यांची बाजू हरीश साळवे यांनी मांडली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते. जोरदार युक्तिवादानंतर हरीश साळवे यांनी ८ दिवसांची मुदत मागितल्यामुळे शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार आक्षेप घेतला.मात्र सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला वेळ देत पुढची तारीख दिली आहे.दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा निर्णय कोर्टानं दिला आहे.
काय झाला कोर्टात युक्तीवाद
एखाद्या गटाला नवा नेता मिळत असेल तर त्यात गैर काय असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. तसेच आम्हाला कागदपत्रं सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्या, अशीही मागणी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केला. तर शिंदे हे पक्षप्रमुखासारखे कसं वागू शकतात? असा सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच पक्षाच्या बैठका घेण्याचा अधिकार हा शिंदेंना नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.
गटनेता हटवण्यावरूनही मोठा वाद
आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणी वेळी गटनेता बदलण्यावरून ही जोरदार वाद झाला. शिंदे यांचं बंड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी तातडीची पावलं उचलत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं होतं. तसेच त्या ठिकाणी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर गटनेता बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असं मत कोर्टाने नोंदवले तर एखाद्या गटाला आपला नेता बदलावा वाटत असेल तर त्यात गैर काय असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला? मात्र कुठेतरी दूर बसून मी नेता आहे सांगणं हे कुठल्या तत्वात बसतं असा युक्तिवाद ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केला.