नाशिक – नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. जिल्ह्याचे सरासरी तापमान हे ४१ अंश सेल्सिअस इतके होते.तर मालेगावचे तापमान ४३.०२अंश सेल्सिअस नोंदवले गेले .गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून प्रचंड उकाडा वाढला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत विदर्भ, राजस्थान आणि मध्य प्रदेश २७-३० एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढलेला असतानाच मागील काही दिवसात कोकणात देखील उष्मा जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान गेली दोन वर्षापूर्वी ३५ ते ४० अंशापर्यंत गेले होते. मात्र आता कोकणातील बहुतांश भागात हे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. ऐन सुटीच्या काळात तापमानाने कहर केल्याने गावी येणार्यांची संख्या देखील घटली आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या वाढत्या उष्म्याचा फटका मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे..
Maharashtra today 27 April pic.twitter.com/KXRBNmpdgG
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 27, 2022