पत्रकाराने दाखवली शाश्वत शेतीची दिशा : सेंद्रिय शेतीतून पिकवला सदाबहार पेरू
येवले तालुक्यात जीवामृत निर्माण करणाऱ्या एन एअरबेटिक फुग्याचा प्रयोग यशस्वी
नाशिक,दि. ४ एप्रिल २०२३ – सध्या शेती करतांना पिकांवर रासायनिक औषधांचा मारा करून पीक घेतले जात आहेत.त्यामुळे कॅन्सर,डायबेटीस, किडनी अशा गंभीर आजारांचा प्रादुर्भाव बळावतो आहे.यासर्वांवर सेंद्रिय शेती हा सर्वोत्तम पर्याय मानला आत आहे. ३० वर्ष सक्रिय पत्रकारिता केल्यानंतर येवले तालुक्यात प्रथमच पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांनी आपल्या जमिनीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतल्या नंतर जीवामृत तयार करणारा ६ हजार लिटर क्षमतेचा एन एरेबेटीक फुगा बसविला आहे.
या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असलेल्या पावणेसात एकर पैकी ४ एकर बांबू लागवड केली.यापैकी बांबूच्या शेतीत ३६ गुंठ्यांत सदाबहार पेरू लागवड केली आहे. या पेरूचे वजन अंदाजे एक किलो असणार असून या सेंद्रिय पेरूची परदेशात मोठी मागणी आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील हा खूप सुंदर अप्रतिम प्रयोग आहे इथे मियावाकी फ्रुट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीने लागवड केलेली आहे. ३६ गुंठ्यामध्ये २००० रोपांची लागवड करून कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरती भर आहे. अनुदानासाठी शासनाचे नियम अत्यंत किचकट बनविल्यामुळे अनुदानाकडे दुर्लक्ष करून खर्चिक परंतु शाश्वत उत्पन्न देणारा हा प्रयोग अत्यंत धाडसाने त्यांनी केला आहे.
या प्रयोगामुळे.शेतीचा सेंद्रिय पोत सुधारणार आहे. यासाठी जीवामृत तयार करणारा ६ हजार लिटर क्षमतेचा एन एरेबेटीक फुगा बसविला आहे. हा प्रयोग आज खर्चिक आहे. उद्या उत्पन्न सुरू झाल्यानंतर हा खर्च शुल्लक ठरणार आहे. या अत्यंत शाश्वत उत्पन्न देणाऱ्या प्रयोगाची म्हणजेच जीवामृत पिकाला सोडणाऱ्या कॉकचा शुभारंभ होत असून येवले तालुक्यात हा प्रयोग प्रथमच त्यांनी राबविला आहे.पत्रकारितेतून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणाऱ्या हरिभाऊ सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रयोगा विषयी माहिती हवी असल्यास ९४२२७६९४९१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हरिभाऊ सोनवणे यांनी की आहे.