महाआघाडीचं नाव ठरलं:२०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना!

पंतप्रधान मोदीं विरोधात अखेर विरोधकांची एकजूट

0

बंगळुरु,दि. १८ जुलै २०२३ –२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांच्या बैठकीत रणनिती ठरवण्यात आली असून या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा होऊन INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मांडला असूनत्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक करत सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA(Indian National Democratic Inclusive Alliance) या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली.यासंबंधीची ११ सदस्यांची संयोजन समिती मुंबईतील बैठकीत जाहीर करु असं ते म्हणाले.मुंबईतील बैठकीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक आज बंगळुरू येथे पार पडली. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना’सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू’ असा विश्वास व्यक्त केला.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की,काँग्रेसला सत्तेचा भूक नाही किंवा पंतप्रधानपदात रस नाही.आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले.

भाजप ईडी, सीबीआय या सारख्या संस्थांचा वापर विरोधी पक्षा विरोधात करण्यात येत आहे.देशाला कसं वाचवायचं आणि देशातील लोकांना कसं वाचवायचं हे आव्हान आहे.देशासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं खरगे म्हणाले. राहुल गांधी यांनी देशातील आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.