मुंबई,१२ फेब्रुवारी २०२३ – आज काही तासांतच बिग बॉस १६ शोच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. ‘बिग बॉस १६’ च्या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने प्रयत्न केले. पण टॉप ५ च्या यादीत आपलं स्थान पक्क करत शिव ठाकरे , एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोट आणि अर्चना गौतम हे ५ स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. पण आता या पाच जणांपैकी विजेता कोण होणार हे लवकरच कळणार आहे. पण ट्रॉफी जिंकण्यासाठी शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी (priyanka choudhary) यांच्यात ‘काटे कि लढत’ पाहायला मिळणार आहे.
लवकरच चाहते आणि स्पर्धकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16 Grand Finale) ची चर्चा रंगत आहे. शोच्या फिनालेची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे. मोठ्या उत्साहात अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस १६’ च्या स्पर्धकाची घोषणा करणार आहे. यासाठी प्रत्येक चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनची ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी कोणता स्पर्धक घरी घेवून जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोशल मीडियावर सर्वत्र शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. एवढंच नाहीतर, दोघांच्या फॅनपेजवरुन अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिव आणि प्रियंका यांनी शोच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्रकरणात पुढाकार घेतला. शिवाय दोघांनी भावनात्मक आणि विचार करुन खेळी खेळली. आता ट्रॉफीसाठी शर्यतीत शिव आणि प्रियंका असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.ते आता काही तासातच स्पष्ट होईल.
प्रियंकाच्या चाहत्यांनी तर तिला विजेती म्हणून घोषित देखील केलं आहे. फोटोमध्ये सलमान खान याने प्रियंकाचा हात धरत ती विजयी झाल्याची घोषणा केली आहे आणि प्रियंकासोबत सलमानच्या दुसऱ्या हाताला शिव ठाकरे असल्याचं दिसत आहे. पण हा फोटे प्रियंकाच्या चाहत्यांनी इडिट केला आहे. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या फोटोची चर्चा असली तरी शिव ठाकरे विजयी व्हावा असे अनेक चाहते सांगत आहेत.
[…] news बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १८’ स्पर्धक शिल्पा शिरोडकर हिला करोनाची […]