१ आणि २ एप्रिलला रंगणार ‘नावा प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धा
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसह जनस्थानच्या सेलिब्रिटींचा सहभाग : क्रिकेट स्पर्धांच्या टी-टी शर्टस् चे अनावरण
नाशिक दि.३१ मार्च २०२३ – नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित व सम्राट ग्रूप प्रायोजित ‘नावा प्रिमियर लिग (एनपीएल) खेळाडूंसाठी मधुरा ग्रुपच्या सौजन्याने देण्यात येणाऱ्या जर्सी (टी शर्टस्) चे अनावरण आज मधुरा ग्रुपच्या सर्वेसर्वा संपदा हिरे व मुख्य कार्यकारी अधकारी प्रफुल्ल पगार तसेच सम्राट ग्रुपचे अविनाश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप हे असून, येत्या दिनांक १ आणि २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासुन महात्मानगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा होणार असून त्याचे युट्युबवरून लाईव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे.
स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत.
ए-गटा मध्ये १) टाईम्स ग्रुप २) पुण्यनगरी ३) दिव्य मराठी
बी-ग्रुप मध्ये १) लोकमत २) सकाळ १) देशदुत
सी -ग्रुप मध्ये १) लोकनामा २) पुढारी ३) रेड एफ एम तसेच
डी -ग्रुप मध्ये १) रेडीओ मित २) नावा ३) जनस्थान या संघांचा समावेश आहे.
या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघाचे दोन व होतील. प्रत्येक ग्रुपचे तीन असे बारा सामने होतील. त्यापैकी चारही ग्रुप मधील अव्वल एक च्या संघांमध्ये उपांत्य सामना व अंतिम सामना होईल.
एन पी एल चे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वारियर्स व मिडीया अॅडव्हर्टायझींग,गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अॅडव्हर्टायझींग, नवांकुर पब्लिसीटी, टॉस पार्टनर मयुर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अॅडव्हर्टायझींग, एखंडे अॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषीदूत बायो हर्बल, ओेमपुजा इलेक्ट्रॉनीक, वेध न्युज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राऊंड उपलब्ध करून दिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅटसमन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात.
मिडिया जगतामध्ये या स्पर्धांविषयी विशेष औत्सुक्य असते. या स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू असून सर्व संघांचे विविध मैदानांवर सराव केला जात आहेत. स्पर्धा युट्युब वरती सुद्धा बघता येणार आहेत.
जर्सी अनावरण प्रसंगी स्पर्धा समिती प्रमुख रवि पवार,सचिन गिते व नावा चे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मा सरचिटणीस दिलीप निकम, सरचिटणीस मिलींद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दिपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरेे , सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी लोकमतचे सुशील झगडे व प्रवीण सचान, सकाळचे सुनिल पाटील, लोकनामा चैतन्य बोडके, टाईम्स ग्रुपचे, अबिद शेख, अभिजित गोरे, बंटी पवार, पुढारीचे प्रल्हाद इंदोलीकर, राम आढाव, दिव्य मराठीचे सचिन जैन, विजय क्षिरसागर, देशदुतचे अमोल घावरे,सचिन कापडणी, पुण्यनगरीचे सागर अहिरे, पंकज ठाकूर, जनस्थान ग्रुपचे अभय ओझरकर, रवी जन्नवार, सुहास भोसले, सचिन शिंदे, मधुरा ग्रुपचे रेडीओ मित तर्फे प्रफुल्ल पगार, प्रसाद चौधरी, रेड एफ एम चे श्रीराम शिंदे, प्रशांत नागरे आदी उपस्थित होते.