नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची किंमत निश्चित

लवकरच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध

0

नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२२ – चीन  जपान, अमेरिकासह कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ  होते आहे.त्यामुळे केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. गेल्या आठवड्यात परवानागी देण्यात आलेली भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लशीला गेल्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून लवकरच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.लसीची किंमत निश्चित केली आहे. या निर्णयानंतर कोरोनाला सामोरे जाण्यात आणखी वेग येईल.

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे.नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना सुईची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.

केंद्र सरकारने जीएसटीसह  या लसीची किंमत निश्चित केली असून शासकीय रुग्णालयात ८४० तर खासगी रुग्णालायात हजार रुपये मोजावे लागणार आहे. इंट्रानेजल वॅक्सीन कोवॅक्सीन आणि कोव्हिशिल्डचे लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून  परवानगी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागिरकांना उपलब्ध होणार आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसला १५० रुपये दर आकारण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम जोडून कोरोना लसीची किंमत हजार रुपये होण्याची शक्यता आहे.

नेझल कोरोनो वॅक्सिन सेंट लुईस येथील वॉश्गिंटन  विद्यापीठात विकसीत करण्यात आली आहे. भारत बायोटेकची या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय  कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.