चांदशीच्या रहिवाशांच्या समस्या लवकरच सोडवणार :छगन भुजबळ
चांदशीच्या नागरीकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी लवकरच बैठक बोलावणार

नाशिक,दि.२९ जुलै २०२३ – शहर विकासाच्या नावाखाली गंगापूररोडच्या पलीकडील चांदशी परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका बांधून मोठमोठ्या जाहिरातीकेल्याने नागरिकांनी या सदनिका विकत घेतल्या जाहिराती जरी मोठ्या प्रमाणात केल्या असल्या तरी या ठिकाणी घर घेणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील नागरीकांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन समस्यांविषयी निवेदन देऊन परिस्थीती विषयी कल्पना दिली.चांदशीकर वासियांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरच एक सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्या तातडीने सोडवू असे आश्वासन मंत्री ना.छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळाला दिले.
येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ,सांडपाण्याची व्यवस्था हि कोलमडली आहे.रस्त्यावरील पथदीप दि सातत्याने बंद असतात मोठया प्रोजेक्टच्या नावाखाली घरे विकल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने येथील रहिवासी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे येथील रहिवाशांनी निवेदन दिले असून अद्यापही नागरिकांच्या समस्यांबाबत कोणतीही दखल घेतली गेल्या नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
चांदशी हा परिसर गंगापुर रोडला लागून आहे. दुस-या बाजुने बापु पुल परिसर आहे. हे दोन्ही विभाग नगर पालिकेच्या हद्दीत आहेत.असे असुन दोन्हिच्या मध्यभागी असलेले चांदशी मात्र अद्याप ग्रामीण मध्येच गणले जाते. तरी चांदशी विभाग नगरपालिकेत समाविष्ट करुन घ्यावा, अशी आम्ही सर्व चांदशीकर विनंती करतो. गंगापुर रोड येथुन सुयोजीत मार्गे चांदशीत येणा-या बापु पुला लगत नविन पुलाचे बांधकाम देखील स्थगीत करण्यात आले आहे, बापु पुल पाण्याखाली जातो तेव्हा चांदशीचा शहराशी संपर्क तुटतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन,पुलाचे बांधकाम लवकर सुरु करुन पुर्णत्वास न्यावे, हा विनंती. चांदशी वासीयांच्या समस्यांची दखल घ्यावी व आम्हाला न्याय मिळावा,अशी मागणी येथील रहिवाशांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली .
या प्रसंगी रश्मी कुलकर्णी,मनीषा जाधव,कविता सातपुते ,नेहा सावळा ,महेश कुलकर्णी आदींसह चांदशी येथील रहिवासी उपस्थित होते



