सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र   

हरिअनंत,नाशिक  

0

हरिअनंत,नाशिक  

शनिमुळे रावाचे रंक होतात व रंकाचे राव होतात. शुभ शनी उच्च व स्वराशीचा मित्र क्षेत्राचा तसेच आपल्या नवमांशाचा  शुभ फलदायी असतो. शनी शुभ असता अगाध कल्पनाशक्ती, स्थिरयुक्त गंभीर,मेहनती, कुशल, कार्यचतुर, कमी बोलणारा, प्रत्येक गोष्टीत गंभीरता बाळगणारा असतो.

शनी ज्याच्यावर कृपा करील त्याला कुबेराची संपत्ती, इंद्राचे ऐश्वर्य, भिमासारखी शक्ती,अर्जुनासारखे युध्दाकौशल्य, कृष्णासारखे युक्तिवाद ज्ञान, चाणक्यासारखी नीती देईल.

अशुभ शनी- नीच राशीचा, शत्रू क्षेत्राचा किंवा अस्तंगत किंवा क्रूर ग्रहासह किंवा दृष्ट असेल, तर अधिक अशुभ फलदायी असतो.जर शनी याहून विपरीत अशुभ किंवा अशुभ ग्राहयुक्त तसेच दृष्ट असेल, तर जातक ईर्षा बाळगणारा, लोभी,अविश्वासू, भित्रा,आळशी,हट्टी, खोटारडा, असंतोषी तसेच पश्चातापाच्या आगीत क्षणोक्षणी जळणारा असतो. शनी ज्याच्यावर वक्र दृष्टी करेल, त्याला मध्यान्हाची भ्रांत होईल. अतीव दारिद्र आणील अशी स्थिती त्या लोकांची होते.

जे अतिशय गोड बोलून समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून  समोरच्यावर अन्याय करतात. अशा स्वार्थी लोकांना शनी साडेसातीत असा धडा शिकवतो की  व्यक्ती उभ्या आयुष्यात त्याला साडेसातीत शनीने दिलेल्या शिक्षेची आठवण राहते.असा इतिहास आहे.

आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.जन्मपत्रिकेत शनी आहे म्हणून जन्मपत्रिकेला अति महत्व आहे .कारण शनी हा कर्माचा मालक आहे. तो न्यायाधीश आहे म्हणूनच तो यमापेक्षा मोठा आहे यासाठीच शनीला यमाग्रज म्हटलं आहे.शनीच फक्त सर्वात अधिक काळ एकाच राशीत राहतो. तसा असा कोणताही ग्रह अधिक काळ राहत नाही. म्हणून शनी जेंव्हा राशीपरिवर्तन करतो, तेंव्हा सहा महिने पूर्वीपासून पुढील वर्षाचे फल देऊ लागतो.

१) शनी नवमस्थ असेल तर पित्याचे सुख फार काळ लाभणार नाही.

२) शनिसमोर रवि जर का धनस्थानी आला तर नेत्रदोष होतात.डोळ्यांची व्यथा,एखादयावेळी अंधातवयोग संभवतो.

३ ) शनिसमोर रवि तृतीय स्थानी आल्यास भावंडांचा नाश, प्रवासात अपघात, मित्र शत्रू बनण्याची शक्यता व्यथा होते.

४ )शनि समोर रवि चतुर्थ केंद्रात आल्यास स्थावरचा नाश,पतीशी वैर,सापत्न मातेशी वैराची शक्यता, बागायतीत नुकसान होते (क्रमशः) भाग – १५३

शुभम भवतु …

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका,पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता…हरीअनंत

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.