सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक) शनिसमोर रवि चतुर्थ केंद्रात आल्यास आपण अतिशय सावधान राहिलं पाहिजे, कारण  शनिसमोर रवी आल्यास आपल्या स्थावराचा क्रमशः नाश होऊ लागतो. एक-एक गोष्ट कमी कमी होऊ लागते. आपली जेंव्हा काही नुकसान होते त्यावेळी आपण दुर्लक्ष केले,आपल्याला कुणी समजून सांगितलं त्यावेळीस आपण आपल्या अहंकारात राहिलो, तर  शंभर टक्के आपल्या स्थावराचा नाश होतो.अशी स्थिती साडेसातीत सुरू होण्यापूर्वी  शनी प्रत्येक राशीच्या व्यक्तीला सावधानतेचा इशारा देत असतो. आता हा शनीचा इशारा, आपण समजून घ्यायचा किंवा नाही, की आपल्या अहंकारी अभिमानात सर्वस्व गमवायचे यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे.

साडेसाती सुरू होण्यापूर्वी  पती-पत्नीत कारण नसता वाद सुरू होतो.असा वाद सुरू होताच दोघात कुणी तरी सतर्कतेने माघार घ्यावी.वाद विकोपाला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.प्रवासात सावधान रहावे. कर्म उत्तम असतील तर विशेष काळजी करण्याचे कारण नाही, पण कर्म चुकीचे असतील आणि अहंकारात स्वतःच्या गुर्मीत जगणार्यांनी,अतिशय गोड बोलून  स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणाऱ्यांचा संपूर्ण हिशेब शनि साडेसातीत घेतो. यासाठी आपण सावधान राहावे.

साडेसातीच्या स्थितीत  साडेसातीत अडकलेल्या व्यक्तीला शनि मुद्दाम कधीचं किंचितमात्र त्रास देत नाही.शनी त्रास देतो, शनी आमच्या मागे लागला असे वारंवार म्हणू नये. शनीवर उगाच आरोप करू नये.जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीला प्रत्येक व्यक्ती स्वतःच जबाबदारअसते याची जाणीव  आणि त्याचे फल शनि साडेसातीत देत असतो. भामट्यांचा बुरखा फाडण्याचे काम शनी करीत असतो.साडेसातीत अतिशय जिवलग मित्र  शत्रू बनण्याची शक्यता असते, म्हणून मैत्रीत उगाच एकमेकांविषयी गैरसमज करून घेऊ नये.

शनिसमोर रवि पंचम भावात आल्यास शिक्षणात मधून मधून अडथळे, संतती विषयी विशेष काळजी घ्यावी.शनिसमोर षष्ठस्थानास रवि आल्यास कर्जबाजारी,शेतीत नुकसान,जनावरांची नुकसान होते. सावत्र मातेचा त्रास.विनाकारण घरात वाद होतात.व्यवसायात नुकसान. एक अनामिक भीती निर्माण होते.शनिसमोर रवि सप्तम केंद्रात आल्यास भार्येपासून त्रास, प्रवासात अडथळे,उघड शत्रू त्रास (क्रमशः) भाग -१५४

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव   सावधानता, आजार, व्यवसाय,  आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत  

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.