सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक) शनिसमोर रवि सप्तम केंद्रात आल्यास भार्येपासून त्रास अर्थात पत्नीची चिडचिड होणार. या चिडचिडीपासून सावधान.प्रवासात अडथळे, कारण नसताना शाब्दिक वाद टाळावेत.अशी स्थिती निर्माण होणे म्हणजे शनीच्या आगमनाचा शंखनाद.शनीचा हा शंखनाद ओळखता आला , तर जीवन अतिशय आनंदी होते कारण शनी हा कर्माचाकारक ग्रह आहे. कर्म करणाऱ्याचे कर्म उत्तम असेल, तर शनी पाहुण्यासारखा येऊन कुठलाहो त्रास न देता निघून जातो. साडेसातीत देखील शनी व्यक्तीला प्रचंड धनवान बनवतो अर्थात शनी व्यक्तीला धनवान बनवण्यापूर्वी व्यक्तीची अतिशय कठीण परीक्षा घेतो. यासाठी आपण नेहमी सतर्क सावधान राहिले पाहिजे.

शनिसमोर रवि अष्टम स्थानी आल्यास प्रवास वाढतो. व्यक्तीची खूप फिरण्याची इच्छा होते. व्यक्ती धार्मिक असेल, तर तीर्थयात्रेच्या निमित्ताने  खूप प्रवास होतो. या प्रवासात खूप त्रास होतो; त्रासदायक स्थिती निर्माण होते. कधी कधी या प्रवासयात्रेत एखाद्या जनावरांपासून त्रास होतो.चिडचिड वाढते.हातून चुकीचे कामे होतात.यासाठी सावधान.

शनिसमोर रवि नवमस्थानात आल्यास वृद्ध मंडळीपासून त्रास.त्यात व्यक्तीचा स्वभाव, व्यवहार ठीक नसेल, तर वडिलोपार्जित इस्टेटीपासून बेदखल होण्याचा  योग देखील उपस्थित होतो. जन्मदात्या पित्याशी कट्टर शत्रूप्रमाणे वैरभाव निर्माण होतो. मोठ्या भावजयीशी बिलकुल पटत नाही.अशी परिस्थिती निर्माण होऊन तीचं स्वरूप नुकसानदायी होण्यासपूर्वीचं आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवले पाहिजे. नियंत्रण प्राप्तीसाठी आपण स्वतःवर  नियंत्रण मिळवलं पाहिजे.

शनिसमोर रवि ११ व्या स्थानी आल्यास व्यक्तीला व्यवसायात अन्य जिथून लाभ होणार आहे त्या लाभ प्राप्तीत अडथळे निर्माण होतात.वडील भावंडांपासून आर्थिक नुकसान आयुष्य कमी. अचानक व्यवसायात उघड शत्रु वाढतात.अतिशय त्रासदायक स्थिती निर्माण होते. मनात आत्महत्याचा विचार येऊ शकतो  सावधान.

शनिसमोर रवि दशम स्थानात आल्यास व्यवसाय,उद्योगधंद्यात अनेकानेक प्रयत्न करूनही  उद्योगधंद्याचे बस्तान कधीच बसत नाही. व्यक्ती जे काही करते त्यात अपयश.स्थावर इष्टटे जाते .अतिशय वाईट प्रसंग निर्माण होतात. कुणावरच विश्वास बसत नाही. मनाची अवस्था अतिशय बेचैन होते.. व्यक्ती व्यसनाच्या आधीन होते. या स्थितीत कुटुंबाची  स्थिती अतिशय  घसरते. घरात कुणीच कुणाचे मत विचारात घेत नाही; प्रत्येकजण स्वतःला जे योग्य वाटेल तेच करतो.. अशा या भीषण परिस्थितीमुळे व्यक्तीच्या आयुष्याची  दयनीय स्थिती होते. यासाठी आपण सावधान राहिलं पाहिजे. आपल्या अहंकारावर, क्रोधावर, स्वार्थी वृत्तीवर वेळीच लगाम लावला पाहिजे..

कारण आपण स्वतःच आपल्या परिस्थितीला  जबाबदार असतो. शनी तर आपल्या कर्माची तपासणी करणार अतिशय कठोर आणि तितकाच प्रेमळ, दयाळू शिक्षक आहे जो  मानवाच्या जीवनाच्या अखेर पर्यन्त मानवाला आपल्या मौनभाषेत शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण बुद्धिमान मानव आपल्या मस्तीत अहंकार, खोट्या अभिमानाच्या मार्गावर शतपाऊली करीत  जीवन कंठीत असतो.
शनीची दृष्टी आपल्या स्वतःच्या घरा व्यतिरिक्त इतर सर्वत्र(क्रमशः)भाग -१५५

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.