सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र 

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक)  शनिची दृष्टी  स्वतःच्या घराव्यतिरिक्त सर्वत्र नुकसान करते. जन्म- कुंडलीच्या प्रत्येक भावात अडीच वर्षे पाहुणा म्हणून मुक्कामी राहणारा  गोचरीत चंद्रराशी- मागील रास आणि चंद्राच्या पुढच्या राशीत असताना साडेसातीने छळणारा,अतिशय दुःख,मानसिक त्रास, विपत्ती भोगावयास लावणारा,नसता झंझट शनी मागे लागला. अशा अनेक अफवामुळे शनी  ज्योतिषात संपूर्णपणे क्रूर खलनायक वाटतो.

शनीवर केला जाणारा हा आरोप  मुळीच सत्य नाही.शनिविषयी अर्धवट ज्ञान असणाऱ्यांनी शनीला आरोपीत करून शनी विषयी भीती निर्माण केलीय, मात्र शनिविषयी  हे भ्रामक आहे. शनि, कष्ट, संकटे, आजारपण, दुःख याचे प्रतिक आहे हे निश्चत सत्य आहे परंतु पुरातन  ज्योतिष शास्त्र ग्रंथात शनीची शुभ  विशेषतः  नमूद केलेली आहे.   शनीच्या खूप साऱ्या महत्वपूर्ण गोष्टींची उपेक्षा केली गेली आहे.

शनी आत्म्याचा, आत्मज्ञानाचा, त्यागाचा प्रतीक आहे. ज्ञान आणि त्याग अध्यात्मिक जीवनाचा मूळ वास्तविक आणि भक्कम पाया तयार होतो; जर  हा शनी कमकुवत आणि चंद्र पीडित असेल तर अशा व्यक्ति  मिथ्या गोष्टीकडे आकर्षित होतात.शनी हा सामाजिक- लोकशाहीचा कारकआहे. शनी चालण्यातील व्यंगाचे, समाजातील शेवटच्या रांगेत असलेल्या  लोकांचे प्रतिनिधित्व करतो.

शनी वृद्धांचे प्रतिनिधित्व करतो.परंतु बदलत्या आधुनिक अर्थशास्त्रीय युगात शनी लोकशाहीमूळे विकसीत होणाऱ्या विविध यंत्रणांची महाशक्ती आहे.धकाधकीच्या जीवनात जीवन आनंदमय करण्यासाठी  जीवनमार्गात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शनीला जाणून घेणे महत्वाचे आहे.

स्थानावश शनी फल – राशीच्या क्रमाप्रमाणे शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे.तसेच आपल्या स्थितीत क्रमानुसार फल देणारा असतो. जर कुंडलीत दोन स्थानात  शनी आला, तर ते शुभ फलदायी असते एरवी शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे फल आपल्या दशेनुसार किंवा मिश्रित रूपाप्रमाणे देतो. कुंडलीत शनीत रवि किंवा  रवित शनी असेल,तर अशुभ फलदायी ठरतो. अशाप्रमाणे शनी- मंगळाची युती,तसेच प्रतियुतीसुद्धा चांगली असत नाही.शनीच्या दशेत शुक्राचे अंतर तसेच शुक्राच्या दशेत शनीचे अंतर  आपले स्वतःचे फल देत  नाही, तर एक- दुसऱ्याचे परस्पर  (क्रमशः)भाग -१५६

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.