शनिशास्त्र : साडेसातीत भाग्यवान माणसाचा भाग्योदयच होतो !

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक)२९ एप्रिलला मीन राशीची साडेसातीला आरंभ होऊन १३ जुलै २०२२ ला मीन राशीची पहिल्या चरणाची साडेसाती समाप्त होते. जानेवारी २०२३ ला मीन राशीची साडेसाती सुरू होते ती साडेसात वर्ष. या साडेसात वर्षात शनीचे तीन चरण पूर्ण होतात. साडेसातीत शनीचा प्रत्येक चरण हा अडीच वर्षांचा असतो.परंतु शनीची साडेसाती म्हणजे वाईटच हा समज सर्वार्थानं अयोग्य आहे.

कारण शनीची मकर आणि कुंभ या दोन राशी आहेत.मिथुन, कन्या, वृषभ आणि तूळ या शनीच्या मित्रराशी आहेत. धनु आणि मीन या समराशी आहेत. त्यामुळे या राशीला शनीची फारशी अशुभ फळे मिळत नाहीत. उलट भाग्यवान माणसाचा साडेसातीत भाग्योदयच होत असतो. तसेच सदाचारी व्यक्तीस स्वराशीत आणि मित्रराशीत शनी असताना साडेसातीचे अशुभ फळ न मिळता साडेसातीत शनी शुभफळेच देत असतो. या कारणे शनिवर आरोप करण्यापूर्वी शनीची साडेसाती समजून घेणे महत्वाचे असते.

शनीच्या साडेसातीचा प्रारंभ,मध्य आणि अंत असे अडीच,अडीच वर्षाचे चरणा प्रमाणे भाग असतात. ज्या दिवशी साडेसाती सुरू होते त्या दिवसापासून सात महिने शनी मस्तकावर, मग त्या पुढील नऊ महिने  तो डोळ्यांपुढे व त्या पुढच्या आठ महिन्यांत  तो मुखावर व उरलेल्या सहा महिन्यात तो  गळ्यावर आपला अंमल गाजवतो.

साडेसातीच्या मधल्या टप्यात म्हणजेच दुसऱ्या अडीच वर्षातील पाहिले दहा महिने हृदयावर,पुढले अकरा महिने पोटावर, त्यापुढील पाच महिने बेंबीवर व शेवटले चार महिने तो  गुह्य स्थानावर आपला प्रभाव गाजवितो.साडेसातीच्या तिसऱ्या म्हणजेचं अंतिम पर्वात पाहिले १३ महिने कमरेवर, त्यापुढील ५ महिने पायांवर व मग उरलेले महिने पावलांवर शनीचा अंमल असतो.

खरं तर मानवी जीवनात सुख- दुःख, आशा- निराशा यांचा खेळ कायम सुरूच असतो. पण ज्याचे कर्म चांगले असते आणि ज्यांचे मन स्थिर असते त्या व्यक्तींचा सुख- दुखाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळी वेगळा असल्याने त्या आपापल्या भोगवट्याचा स्वीकार इतक्या सहजतेने करतात की त्यामुळे दुःखाची तीव्रता ही आपोआपच कमी होते.

साडेसातीमध्ये प्रभु श्रीरामरायांना वनवासाचा त्रास सोसावा लागला. पण त्या त्यामुळेच रावणासारख्या राक्षसांचा वध सिद्ध झाला. सीतेला अग्निदिव्य करावे लागले, पण तिचे पातिव्रत्य त्यामुळे झळाळून उठले. साडेसातीमुळे काही काही व्यक्तींचे  गर्वहरण होते. लौकिक प्रतिष्ठेला धक्का बसून भाऊबंदकी, गृहकलह अनारोग्य, कोर्ट कचेरी (क्रमशः)भाग -१५९

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.