- हरिअनं
त,नाशिक
रवि–बुध-गुरू- शनि-: मानी,भांडखोर,कवी,संशोधक,संपा दक,साहित्यिक, वाईट आचरणाचा. अनेक तंटे उत्पन्न होतात.सन्मानिय
रवि-गुरू-शुक्र-शनि-:कलाकु शल ,धाडसी, वाचाळ, सदाचारी,अल्पसुखी,वाचाळ, वनविहारी,प्रवासी,साधनसंपन्न, कलाकौशल्य असलेला, कनिष्ठ वर्गाचा नायक, हट्टी.
रवि-बुध-शुक्र-शनि-: उत्तम भाषाशैली, सत्यवक्ता, तत्वनिष्ठ, सद्वर्तनी, सुमुखी, सदाचारी, प्रेमळ, कुणालाही मदत करणारे
रवि-चंद्र- मंगळ- शनि: हा योग ज्योतिषशास्त्रात भयंकर क्रांतिकारक मानावा लागेल झाला तर राजा नाही तर भिकारी. पारतंत्र राष्ट्रात जन्म असेल तर महान क्रांतिकारक. पण हा योग 4/8/9 या राशीचे लग्न असून 6/10/12 या स्थानात झाला पाहिजे. म्हणजे एक महान साधू अथवा क्रांतिकारक होतो.बाकीच्या योगाला श्रीमंत योग करतो. मात्र माता-पित्याच्या पश्चात द्विभार्या योग संभवतो. एक निश्चित जन्म ज्या स्थितीत झाला असतो, त्या पेक्षा श्रेष्ठ दर्जा, व्यापार,सट्टा यात भरपूर पैसा, ऐश्वर्यभोग, पण बायका अधिक व मुले कमी होतात.
रवि-चंद्र-बुध-शनि:जन् मदात्या- आईबापानंतर भाग्योदय,आयुष्य सुखी मोठे उद्योगधंदे, प्रसिद्धीयोग, बंगले, शेती- वाडी वगैरे योग 1/3/4/5/8/9 या राशीत असून यापैकी एक लग्न असता योग्य चांगला असतो.
रवि-चंद्र- गुरू- शनि: हा योग पूर्व वयात अजिबात सुख देत नाही. पूर्वार्जीत इस्टेट असत नाही. असली तर कोर्ट दरबार करावा लागतो. आई- वडील असेपर्यंत मिळवणे शक्य होत नाही. नंतर पोटापूरते मिळवतो. बायको चांगली मिळते. गृहदक्ष असते. संततीचा काही उपयोग होत नाही. वडिलांचा व्यवसाय, कॉन्ट्रॅक्टर, वकील असे व्यवसायी असतात वृद्धपकाळात थोडे सुख मिळते.
रवि-चंद्र- शुक्र- शनि: या युतीचे फळ चमत्कारिक आहे, यात आई- बाप, बायको हे तिन्ही पूर्वजन्मातील शत्रू असल्यासारखे वाटतात सूड उगवण्यासाठी टपून बसलेले असतात.असा समज होतो
रवि- मंगळ-बुध- शनि- विश्वासु, परमार्थिमार्गी. यात क्रांतिकारी असतात. अन्यायी राजसत्तेच्या विरोधात कार्य करणारे. परोपकारी, खाणे- पिणे, कपडे, शारीरिक आसक्ती नसते. कुटुंबाची काळजी न करणारे. ही युती4/ 8 /9 ही लग्ने असून 5/10/12 या स्थानात होईल तर चांगली फळं मिळेल. 2/6/10 या स्थानात होईल तर संसार होत नाही. ह्या व्यक्ती संसार, दरबारी धाडसाने काम करणारी असतात.डेंटिस्ट,सर्जन फार चांगले होतात. आई- बापाच्या पश्चात भाग्योदय. आई-बाप,भाऊ- बहीण यांचे सख्य नसते. पूर्ववयात सौख्य नाही मात्र ( क्रमशः) भाग -१३९
संपर्क – 9096587586