“मानस मराठी” प्रस्तुत ” जय सिवराज है ” गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला

यूट्यूब वर गाण्याच्या टीझरला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक – शिवजयंती निमित्त येत्या १९ फेब्रुवारीला “मानस मराठी” प्रस्तुत , संजय पटेल निर्मित, ” जय सिवराज है ” हे गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.महाराजांच्या साम्राज्यात त्यांच्या थोरवीच उत्तम रित्या वर्णन करणारे महा कविभूषण यांच्या काव्या वर आधारित हे गीत योगेश खरात, स्मिता कुलकर्णी आणि प्रसाद शिरसाठ यांनी रचले आहे.

या गाण्याचे संयोजन, त्याला उत्तम चाल आणि लयबध्द संगीत प्रसाद शिरसाठ याने दिले आहे. या अगोदर ” रेहमत हे, माझा मल्हार , हे गजानन , साजणी अशा अनेक गाण्यांना त्याने संगीत दिलेले आहे.गाण्याचं रेकॉर्डिंग ‘ अपोस्ट्रोफी स्टुडिओ नाशिक,डॉन स्टुडिओ पुणे, आणि साऊंड आयडियाज स्टुडिओ मुंबई इथे करण्यात आलेआहे.

हिंदी चित्रपट सृषटीतील बदलापूर, बाहुबली, भाग मिल्खा भाग ,परमाणु तसेच मराठीत फत्तेशीकस्त, कट्यार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटांना स्वर दिलेल्या पार्श्वगायक “दिव्य कुमार ” यांचा बुलंद आवाज या गाण्याला लाभला आहे.गाण्याचं कोरस दर्शना जोग , पुनम गोडबोले, तन्वी अभ्यंकर , भाग्यश्री अभ्यंकर , चिन्मय जोग , सौरभ दफ्तरदार, आदित्य आठल्ये , ऋषिकेश केळकर , तन्मय अभ्यंकर , धनंजय पवार यांनी गायलं आहे.

या गाण्यात महाराजांच्या प्रमुख भूमिकेत पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर दिसणार आहे ,त्याच बरोबर जिजाऊंच्या भूमिकेत चैताली जाधव ,सुभेदाराच्या भूमिकेत अखिल सुगंध ,हर्षवर्धन निकम दिसणार आहेत.

The song Jai Sivaraj Hai presented by Manas Marathi will soon reach the audience

गाण्याचं दिग्दर्शन ज्ञानेश्वर राजकुले ( डेनी ) व सहकला दिग्दर्शन हर्षवर्धन राजपूत यांनी केले आहे तसेच छायाचित्रण रोहित खुळे व संकेत जंगम ( हाफ मुन फिल्म्स अँड प्रोडक्शन ),ग्राफर -राम कस्पटे , ऐश्वर्या धीवर ,प्रकाशक – चिकू नागेसिया ,रोहन टाक ,रोहित जोगदंड आणि साहिल गोडसे यांनी केले आहे.त्याच बरोबर पोस्टर अमोल कांबळे यांनी केले असून मेकअप एन .ललित ,मेकप अकेडेमी ,केशभूषा राधिका गेडिया , वेशभूषा सुशांत मालवंडे, प्रशांत रंधे व आभूषणे वैशंपायन सन्स सोनचाफा ज्वेलर्स नाशिक येथून झाले.

तसेच या प्रकल्पाचे प्रमुख व्यवस्थापन – सुशांत मालवंडे व सृष्टी मालवंडे नाशिक यांनी कुठले ही अडथळे न येता छायांकन उत्कृष्ट रित्या पार पाडण्यास मोठे सहकार्य केले तसेच हे गाणे यशस्वी करण्यात गणेश बागुल,रोहन गोवर्धने, सिद्धार्थ जाधव ,वेदांत भामरे, मयूर खरोटे , शुभम शेळके ,प्रतीक नाईक अतुल विधाते , अक्षय कचरे , राजहंस डेकोरेटर्स , दामिनी ड्रेसेस , रेंट क्लब यांचे ही विशेष संयोजन लाभले.

नुकताच या गाण्याचा टीझर ” मानस मराठी ” या यूट्यूब चॅनल वर रिलीज झाला असून या टीझरला रसिकांनी अल्पावधीत उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.