मुंबई, दि,२० मार्च २०२३- जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून सुरु असललेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप संघटनेनं मागे घेतला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे.उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.
दरम्यान आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी २८ मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.