शेन वॉर्नच्या आकस्मित निधनाने क्रिकेट जगताला मोठा धक्का 

0

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज शेन वॉर्नच्या आकस्मित निधनाने क्रिकेट जगाताला मोठा धक्का धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या निधनामुळे केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे.शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने थायलंड  येथे निधन झाले आहे.दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाजगत मुकलं आहे.

शेन वॉर्नने सकाळी केलेलं ट्विट आता चर्चेचा विषय ठरला आहे.सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. त्यांनी लिहलंय की, रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. तो क्रिकेटमधील महान खेळाडू होता आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होता. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी क्रिकेटला खूप काही दिलं. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं. या बिकट काळात मी Ros आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांसोबत आहे. RIPअशा आशयाचं भावूक ट्विट शेन वॉर्न यांनी सकाळीच  केलं होतं आणि दुर्दैवाने संध्याकाळी त्यांच्याच मृत्यूची बातमी आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील दोन क्रिकेटपट्टूंचे एकापाठोपाठ निधन झाल्यानं क्रिकेट विश्वावर मोठी  शोककळा पसरली आहे.

आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी कोली होती. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती.ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून शेन वॉर्नला ओळखलं जात होतं. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्नला महान बॉलरपैकी एक मानलं जातं. १९९२ मध्ये त्यांनी पहिली टेस्ट मॅच खेळली होती आणि श्रीलंकेच्या मुरलीधरननंतर १००० आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेणारा दुसरा बॉलर ठरला.

शेन वॉर्न त्यांच्या जादुई फिरकीसाठी प्रसिध्द होता. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्न यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर ७०० पेक्षा जास्त विकेट्स मिळवल्या होत्या, तर वनडेमध्ये २९३ विकेटस पटकावल्या होत्या. शेन वॉर्न यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न यांना जगातील महान लेग स्पिनर मानले जात होतं. त्यांनी जगातील प्रत्येक मैदानावर गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!