दीड महिना वणीचे सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

२१ जुलै ते ५ सप्टेंबर दरम्यान मंदिर राहणार बंद…

0

नाशिक – आज दिवसभर नाशिक शहरासह काही भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी काल पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच काल (दि. ११ जुलै) रोजी सप्तशृंगी गडावर भाविक परतीच्या मार्गाने खाली उतरत असताना भिंत कोसळून पावसाचे पाणी पायऱ्यांवरून खाली आले.

अचानक झालेल्या या ढगफुटी सदृश्य घटनेने सहा भाविक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, हंगामातील या पावसामुळे गडावर जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. २१ जुलै पासून पुढील ४५ दिवस भाविकांना गडावर जाण्यास मनाई असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

याकाळात केवळ मंदिर बंद असणार असून येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतमस्तक होता येणार आहे. पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार असल्याचे विश्वस्त संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्याबरोबरच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तनिवास व इतर सुविधा या कार्यरत असेल असेही मंदिर संस्थानच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.