नाशिकच्या त्रंबकेश्वर जवळ MRF टू व्हिलर रॅलीचा थरार सुरु

0

नाशिक,५ फेब्रुवारी २०२३ – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार रंगला आहे.आज स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन अंबोली विकेंड होमचे संचालक महेंद्र बच्छाव यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले . त्यावेळी ज्या विविध गावातून स्पर्धा जाणार आहे त्या गावातील सरपंच , उपसरपंच हे देखील उपस्थित होते .

काल शनिवारी सकाळी रवींद्र वाघचौरे याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील सहभागी ४८ वाहनांची स्पर्धापूर्व वाहन तपासणी व  कागदपत्रांची छाननी अमर गायकवाड , मिलिंद जोशी व सुधीर जोशी यांनी केली .त्या नंतर सर्व स्पर्धकांना रॅली चा मार्ग दाखवण्यात आला .

महिंद्र बच्छाव ग्रुपच्या “अंबोली विकेंड होम” येथून रविवारी सकाळी ८;३१ वा. मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली .या स्पर्धेत एकूण १४४ किलोमीटर चा मार्ग असून त्यापैकी ५३. किलोमीटर हा स्पर्धात्मक असणार आहे . ग्रामीण भागातील अत्यंत अवघड अश्या रस्त्यावरून हि स्पर्धा जाणार आहे . या मार्गावर आपली कसब दाखवताना स्पर्धकांनी चांगलीच दमछाक होणार आहे .

नाशिकच्या एडब्लयू इव्हेट्‌सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यताने एम आर एफ मोग्रीप, टीव्हीएस  अपाचे आरटीआर, गॉडस्पीड रेसिंग, आनंद बच्छाव ग्रुपच्या “आंबोली विकेंड होम” आणि गोदा श्रद्धा फौंडेशन या प्रयोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या ११ गटात रॅली रंगणार आहे. याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे . तर विविध गटांमध्ये  विक्रमी अश्या ४८ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे .

स्कूटर गटात स्पर्धकांचा मोठा दबदबा असून यंदाच्या हंगामाचा आघाडीवीर नाशिक चा  शमीम खान -पेट्रोनास  टीव्हीएस रेसिंग आणि द्वितीय स्थानावर असलेला एप्रिलिया जेबी रेसिंग चा पिंकेश ठक्कर  कशा पद्धतीने टक्कर देतात हे बघणे रंजक ठरेल. महिला गटात टीव्हीएस रेसिंगच्या पी.एम.ऐश्वर्याने ओळीत तिनही फेर्‍या जिंकल्याने तिच्या मार्गात फारसा अडसर नसेल. स्पर्धेत एकुणच पेट्रोनास टीव्हीएस  विरुद्ध एप्रिलिया जेबी रेसिंग स्पर्धकांमध्ये स्कूटर गटातील मुकाबला रंगतदार ठरणार आहे .

स्पर्धेदरम्यान कोणाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास त्याकरिता तीन सुसज्ज रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे, त्यातील एका रूग्णवाहिकेत ट्रॉमा केअर यूनिट सज्ज असेल. स्पर्धेच्या दळणवळणाच्या व संचालनाच्या दृष्टीने रेडियो संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे अशी माहिती रॅली चे क्लार्क ऑफ कोर्स ( COC ) तथा ए डब्लू इव्हेंट्स चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी दिली आहे.

सदर स्पर्धेचा स्पर्धात्मक मार्ग त्र्यंबकेश्वर आणि हरसूल च्या दरम्यान नांदगाव कोळी खरवळ फाटा – हेदुलीपाडा – नांदगाव कोळी – वरसविहीर – खरवळ आणि खरवळचा फणस पाडा फाटा – वीरनगर – आडगाव देवळा फाटा यादरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हरसुल – वाघेरा घाट मार्गे – “अंबोली विकेंड होम” येथे सर्विस साठी येतील, अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक ३ वेळा पार पाडणार आहे.

अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे . नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धा प्रकारातील बारकावे माहित असल्याने स्पर्धास्थळी एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.