नाशिकमध्ये रविवारी रंगणार MRF राष्ट्रीय टू व्हिलर रॅलीचा थरार

MRF टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक राष्ट्रीय दुचाकी रॅलीच्या अंतिम फेरीचे ५  तारखेला नाशिकमध्ये आयोजन : वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धा 

0

६ वी व अंतिम फेरी रंगणार नाशिकच्या बोचऱ्या थंडीत..!!!

नाशिक १ जानेवारी २०२३ – दरवर्षी प्रमाणे नाशिकमध्ये उद्या (रविवार दिनांक ५ फेब्रु २०२३ रोजी ) ‘एमआरएफ  टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक’ ही राष्ट्रीय दुचाकी रॅलीची सहावी फेरी रंगणार असून पुण्या पाठोपाठ नाशिकमध्ये या स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार रंगणार आहे.

शनिवारी सकाळ पासून आनंद बच्छाव ग्रुपच्या “अंबोली विकेंड होम” येथे या रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कागदपत्रांची छाननी तसेच गाड्यांची स्पर्धापूर्व वाहन तपासणी घेण्यात येणार आहे.

नाशिकच्या एडब्लयू इव्हेट्‌सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यताने एम आर एफ मोग्रीप, टीव्हीएस  अपाचे आरटीआर, गॉडस्पीड रेसिंग, आनंद बच्छाव ग्रुपच्या “आंबोली विकेंड होम” आणि गोदा श्रद्धा फौंडेशन या प्रयोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या ११ गटात  ही रॅली रंगणारअसून याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. स्टार ऑफ महाराष्ट्र या राज्यभरातल्या खेळाडूंच्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शनिवारी दि. ०४/०२/२०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता सर्व स्पर्धकांना  आनंद बच्छाव ग्रुपच्या “अंबोली विकेंड होम” येथे ध्वज दाखवून मान्यवरांच्या हस्ते औपचारिक  सुरूवात करण्यात येणार आहे.  त्यानंतर सर्व स्पर्धकांचा जत्था स्पर्धात्मक मार्गाची पाहणी करून “आंबोली विकेंड होम” येथे परत येईल .

उद्या रविवारी दि. ०५/०२/२०२३ सकाळी ८-३१ वाजता “अंबोली विकेंड होम” येथून पहिली गाडी  नांदगाव कोळी – खरवळ फाटाच्या दिशेने रवाना होईल. प्रेक्षकांना विदेशी बनावटीच्या दुचाकी सोबत स्कूटरच्या थरारक रायडिंगची लज्जत अनुभवायला मिळेल. सकाळी ९-००  वाजता नांदगाव कोळी – खरवळ फाटा येथून रॅलीचा स्पर्धात्मक प्रारंभ होईल त्यामुळे प्रत्यक्ष रॅली मार्गावर जाऊन स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता प्रेक्षकांना रॅली सुरू होण्याच्या एक तास अगोदर स्पर्धा मार्गावर प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सर्वांकरिता स्पर्धा मार्ग बंद करण्यात येईल व पूर्णत: निर्मनूष्य केलेल्या रस्त्यावर स्पर्धा घेतली जाईल. या मार्गावर जनावरे व खासगी अशी कोणत्याही स्वरूपाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून त्याकरिता कार्यकर्त्यांची मोठी फळी तैनात करण्यात आली आहे.

स्पर्धेदरम्यान कोणाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास त्याकरिता तीन सुसज्ज रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे, त्यातील एका रूग्णवाहिकेत ट्रॉमा केअर यूनिट सज्ज असेल. स्पर्धेच्या दळणवळणाच्या व संचालनाच्या दृष्टीने रेडियो संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे अशी माहिती रॅली चे क्लार्क ऑफ थे कोर्स COC तथा ए डब्लू इव्हेंट्स चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी दिली आहे.

सदर स्पर्धेचा स्पर्धात्मक मार्ग त्र्यंबकेश्वर आणि हरसूल च्या दरम्यान नांदगाव कोळी खरवळ फाटा – हेदुलीपाडा – नांदगाव कोळी – वरसविहीर – खरवळ आणि खरवळचा फणस पाडा फाटा – वीरनगर – आडगाव देवळा फाटा यादरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हरसुल – वाघेरा घाट मार्गे – “अंबोली विकेंड होम” येथे सर्विस साठी येतील, अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक ३ वेळा पार पाडणार आहे.
यंदाच्या हंगामात राष्ट्रीय गटाच्या एकूण ९ गटांपैकी ५ गटांमध्ये शर्तीची चुरस जेतेपद जिंकण्यासाठी बघण्यात येणार आहे.

स्कूटर गटात स्पर्धकांचा मोठा दबदबा असून यंदाच्या हंगामाचा आघाडीवीर नाशिक चा  शमीम खान -पेट्रोनास  टीव्हीएस रेसिंग आणि द्वितीय स्थानावर असलेला एप्रिलिया जेबी रेसिंग चा पिंकेश ठक्कर  कशा पद्धतीने टक्कर देतात हे बघणे रंजक ठरेल. महिला गटात टीव्हीएस रेसिंगच्या पी.एम.ऐश्वर्याने ओळीत तिनही फेर्‍या जिंकल्याने तिच्या मार्गात फारसा अडसर नसेल. स्पर्धेत एकुणच पेट्रोनास टीव्हीएस  विरुद्ध एप्रिलिया जेबी रेसिंग स्पर्धकांमध्ये स्कूटर गटातील मुकाबला रंगतदार ठरेल.

स्पर्धेत नाशिककर स्पर्धाकांचा लक्षणीय सहभाग 
या स्पर्धेत नाशिककर स्पर्धाकांचा लक्षणीय सहभाग असेल, नाशिकच्या कौस्तुभ मच्छे, हर्षल कडभाने, निलेश ठाकरे, संतोष सरकाळे आणि हितेन ठक्कर यांचाही विविध गटांमध्ये प्रवेश घेतला आहे.

१७.५ किलेा मिटर स्पर्धात्मक अंतराच्या तीन फेर्‍या होतील.  स्पर्धेचा संपूर्ण मार्ग तुटलेला डांबरी रास्ता असून  त्यामुळे रॅलीची रंगत अधिक वाढणार आहे. दुपारी २-०० वाजता चौथ्या फेरीचा समोराप होईल. त्यानंतर दुपारी ४-३० वाजता स्पर्धेचे प्राथमिक निकाल घोषित केले जातील. हरकती व अन्य बाबी तपासल्यानंतर ४-३० वाजता अंतिम निकालाची घोषणा करण्यात येईल व संध्याकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण “मेहेर हब रेस्टॉरंट” गंगापूर डॅम येथे रात्र भोजनासहित करण्यात येईल.

या रॅलीचे  मुख्य वाहन तपासनीस म्हणून माजी राष्ट्रीय विजेता ताठ FMSCI चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी रवींद्र वाघचौरे हे काम पाहत आहे. त्याच प्रमाणे अंकित गज्जर स्पर्धक समन्वयक अधिकारी, सुधीर जोशी सुरक्षा अधिकारी, DCOC सुरज कुटे आणि  श्रीपाद व्यवहारे/ आदित्य कंसारा / मनीष छाजेड / हेमंत झुरानी / अमोल जोशी / किरण वाघचौरे / मंदार भांडार / अरुण आपटे / सलील दातार / आनंद बनसोड /  अमित बागुल / राजेंद्र वाघचौरे / अमर गायकवाड / मिलिंद जोशी / शेखर म्हस्कर / मनोज जोशी / जयवंत हागोटे काम पाहत आहे.

त्याच प्रमाणे स्पर्धात्मक मार्गात येणाऱ्या वेलुंजे (बाळूभाऊ उघडे), नांदगाव कोळी (मनोहर गवळी),  वरस विहीर (धोंडीराम उगले), खरवळ(गोकुळ गारे व सुभाष मौळे), जयवंत हागोटे, उत्तम तिडके या   गावांच्या सरपंचाचाही आणि सर्व नागरिकांचा यात मोलाचा वाट आहे .त्याच प्रमाणे FMSCI कडून रवी शामदासानी, प्रशांत गडकरी आणि मनीष चिटको यांची नियुक्ती स्टिव्हर्ड म्हणून करण्यात आली आहे.

वृत्तपत्र छाया चित्रकारांसाठी विशेष स्पर्धा 
एम आर एफ मोग्रीप या स्पर्धेत वृत्तपत्र छायाचित्रकारासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली असून दैनिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रासाठी पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत . या स्पर्धेसाठी शर्ती व अटी लागू आहेत .

प्रथम बक्षीस : रोख रु. दोन हजार
व्दितीय बक्षीस : रोख रु. एक हजार पाचशे
तृतीय  बक्षीस : रोख रु. एक  हजार
उत्तेजनार्थ बक्षीस : रोख रु . पाचशे
दैनिकात प्रसिद्ध झालेल्या फोटोसाठीच हि स्पर्धा आहे .दि ५ फेब्रु . व ६ फेब्रु २०२३ रोजी होणाऱ्या स्पर्धेचे  फोटो ग्राह्य धरण्यात येतील .सदर फोटोचे कात्रण व त्या बरोबर ओरिजनल फोटो प्रिंट ( साईझ  ६x ८ )  देणे आवश्यक आहे . फोटोच्या मागे छायाचित्रकाराचे नाव , पत्ता , दैनिकाचे नांव , मोबाईल नं. तसेच प्रसिद्धीची तारीख असणे आवश्यक आहे . स्पर्धा झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत  ९ फेब्रु. २०२३ पर्यंत   संध्याकाळी पाच वाजेपर्यंत  सदर फोटो शार्प मार्क रबर स्टॅम्प ,जुने सी बी एस स्टॅन्ड समोर , सिंग्नल जवळ , सी बी एस .  नाशिक येथे जमा करावे . उशिरा आलेल्या फोटोचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही . *
अमित वाघचौरे क्लार्क ऑफ दि कोर्स – कॉक मोबाइल – ९५९५९५८९५१ ई-मेल – awevents.nasik@gmail.com

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.