वंदे भारत एक्सप्रेस मुळे एका दिवसात होणार साई दर्शनाचीं इच्छा पूर्ण !

मुंबई शिर्डी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी किती तिकीट असणार ! 

0

मुंबई,८ फेब्रुवारी २०२३ – येत्या १०  फेब्रुवारी पासून  महाराष्ट्राच्या रेल्वेमध्ये दोन वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. त्यामुळे नाशिक सह आता राजधानी मुंबईमधील साई भक्तांना वनडे मध्ये साई दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या रूटवर या दोन ट्रेन धावणार आहेत.यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे मुंबई, नाशिक, शिर्डी ही शहरे लोहमार्गाने जोडली जाणार आहेत.

१० फेब्रुवारी रोजी मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

वंदे भारत ट्रेन मुळे सध्या स्थितीला जी रस्ते मार्गाने वाहतूक कोंडी होत आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे साई भक्तांना शिर्डीला सोयीची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते नाशिक आणि नासिक ते शिर्डी एकाच दिवसात कव्हर होणार असल्याचा दावा केला जातो. सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीतून मुंबईकरांना शिर्डीला दर्शनासाठी यायचे असल्यास मुंबई ते इगतपुरी तेथून पांढुर्ली मार्गे सिन्नर आणि सिन्नरहून शिर्डी असा प्रवास करावा लागतो. एका अंदाजानुसार साधारणतः ३५० किलोमीटर एका बाजूने रस्त्याने मुंबईकरांना शिर्डी गाठावी लागत होती.

म्हणजेच हा दोन्ही बाजूचा प्रवास ७०० किलोमीटर लांबीचा बनतो. त्यामुळे साई भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवासात अधिक वेळ खर्च होतो. परंतु आता या ट्रेनमुळे वेळेची बचत होणार आहे. वंदे भारत ट्रेन ने मुंबईहून शिर्डी प्रवास केल्यास ३४३ किलोमीटरचे अंतर राहणार आहे. खरं पाहता शिर्डी जाण्यासाठी सद्यस्थितीला थेट ट्रेन उपलब्ध नसल्याने साईभक्तांचा बाय रोड प्रवास हा चालू आहे. मात्र आता या वंदे भारत ट्रेनमुळे निश्चितच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.१० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन साईभक्तांसाठी यामुळेच आनंदाची पर्वणी राहणार आहे. सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनला दादर, ठाणे, नाशिक रोड, मनमाड असे थांबे राहणार आहेत.

ही गाडी सकाळी ६:०० वाजता  सीएसएमटीवरून निघेल व साडेअकरा वाजता शिर्डीला पोहचणार आहे. तसेच ही गाडी शिर्डीहून सायंकाळी पाच वाजता निघणार आहे आणि रात्री अकरा वाजता सीएसएमटीला पोहचणार आहे.मुंबईकरांसाठी निश्चितच ही गाडी आनंदाची पर्वणी राहणार आहे शिवाय नाशिकवासीयांनाही या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट चे दर हाती आलेल्या एका मीडिया रिपोर्ट नुसार मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करण्यासाठी चेअर कार साठी ९००-११०० रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी १९००-२२०० रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे.मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस तिकीट चे दर हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी ८०० ते १००० आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी १६०० ते १८००  रुपये दर असण्याची शक्यता आहे.या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता,पाणी बॉटल देखील मिळण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!