नाशिक,दि ६ डिसेंबर २०२३ –रसिक सूर नाशिक यांच्याकडून मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड अँड वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांच्यामार्फत ३६ तासांचा कराओके सोलो गाण्यांचा रेकॉर्ड होणार आहे. भारतामध्ये अशा प्रकारचे हे पहिलेच रेकॉर्ड होत असून ह्या रेकॉर्डमध्ये गायकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अनघा धोडपकर यांनी केले आहे या रेकॉडमध्ये
सहभागी होण्यासाठी भारतामधून कोणीहीगायक सहभागी होऊ शकतो.
सदर रेकॉर्ड हे ऑफलाइन असेल जास्तीत जास्त लोकांनी त्वरित संपर्क करावा. २७ आणि २८ जानेवारी २०२४ रोजी नाशिकमध्ये हे रेकॉर्ड होणार असून फॉर्म भरण्यासाठी गायकांनी अनघा धोडपकर मोबाईल नंबर 8652056990 किंवा 8169383474 यावर तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.