राज्यात या २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई,दि,११ जुलै २०२३ –महाराष्ट्रात मान्सून जरी उशिराने दाखल झाला असला तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे.गेल्या दोन दिवसांपासून कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र आता कोकणासह मुंबई, पुण्यातही पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यातील २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र काही जिल्ह्यात पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे.

कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,नाशिक,नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारे देखील वाहतील.

तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या परिस्थितीमध्ये १३ जुलैनंतर सुधारणा होऊ शकते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.