विमान प्रवासात आता ‘हे’ नियम बंधनकारक

0

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत त्याच पार्श्वभूमीवर विमान प्रवासात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) आदेश दिले आहेत.

विमान प्रवासात मास्क घाला नाही तर दंड भरायला तयार रहा अशी सक्त ताकीदच DGCA ने प्रवाशांना दिली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने (DGCA) बुधवारी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत. विमान प्रवासादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या प्रवाशांना या परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

विमान कंपन्यांना प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घातला आहे की नाही याची खात्री करावी लागेल. जर एखाद्या प्रवाशाने सूचनांचे पालन केले नाही तर एअरलाइन त्याच्यावर कठोर कारवाई करेल. बुधवारी देशात कोरोनाचे ९,०६२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,०५,०५८ वर आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता DGCA ने कडक पावले उचलण्याची घोषणा केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.