नाशिक,१५ फेब्रुवारी २०२३ – कोरोना महामारीमुळे दोन वर्ष खंड पडलेले नाशिक रन यंदा पुन्हा जोमाने घेण्यात येणार आहे नाशिक मधील सर्वात जुना व मानाचा असा नाशिक रन हा कार्यक्रम असून येत्या शनिवारी (दि. १८) महात्मा नगर येथील मैदानावर सकाळच्या हजारो नाशिककर धावणार असल्याची माहिती नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
२००३ सालापासून नाशिक रन ह्या उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून करोना मधील काळात देखील हा उपक्रम सातत्य राखत २०२१ व २०२२ मध्ये छोट्या प्रमाणात नाशिक रनच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.नाशिक रन हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी होत आलेला आहे. यंदा मात्र तो फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होत आहे. नाशिककरांच्या आवडीचा आणि पसंतीचा हा रन फॉर फन सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. यात मोठ्यांसाठी ४.५ किलोमीटर व लहानांसाठी २.५ किलोमीटर असणार आहे. याची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड पासून सुरू होऊन जेहान सर्कल व परत महात्मा नगर ग्राउंड असणार आहे.
नाशिक रनकडे देणगी रूपाने जमा होणारा निधी हा नाशिक रन ट्रस्टच्या कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही. सदर व्यवस्थापन खर्च हा बॉश व टिडिके या कंपन्या स्वतः करतात. अशा प्रकारे देणगीदारांनी नाशिक रनसाठी दिलेला निधी हा संपूर्णपणे सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो. नाशिक रन ट्रस्टसाठी दिलेली देणगी ही ८० जीनुसार आयकरात सूट मिळण्यास पात्र आहे.
नाशिक रन नोंदणी फी लहान मुलांसाठी ३०० तर मोठ्यांसाठी ३५० रुपये प्रत्येकी इतकी आहे. प्रत्येक नोंदणीधारकास आकर्षक असा नाशिक रन २०२३ चा टी-शर्ट मोफत देण्यात येणार आहे. या रनमध्ये भाग घेणाऱ्यास नाशिक रनचा टी-शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. लहानांसाठी २६, २८, ३०, ३२, ३४ तर मोठ्यांसाठी ३६, ३८, ४०, ४२, ४४ या साइजमध्ये टी-शर्ट उपलब्ध आहेत. इतर माहितीसाठी ७७५७०२२५६६/९७६५४९९२३६ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच नाशिक रन २०२३ करिता नोंदणीसाठी नोंदणी स्टॉल सोमवार दिनांक १३-०२-२०२३ पासून महात्मा नगर ग्राउंड येथे सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत चालू असेल.असे ही पत्रकार परिषदेत आयोजकांतर्फे सांगण्यात आले. .
सहभागींना बक्षिसांची संधी नाशिक रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध प्रायोजकांद्वारे लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. रन संपल्यानंतर या ड्रॉची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. नाशिक रनच्या विश्वस्तांमार्फत सर्व नाशिककरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कठीण काळात देखील नाशिक मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवण्य यांचा समावेश होतो.
नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट उद्देश पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करीत असून आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रमांना मदत केलेली आहे. त्यात प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा पुरविणे, आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवून लोकांचे जीवनमान उंचावणे व खेळासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे यांचा समावेश होतो. कोरोना सारख्या कठीण काळात देखील नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे वंचित समाजापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवण्यात आली.
२०२० पासून नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे केल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती खालील प्रमाणे आहे.
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा, बेरवळ, जिल्हा नाशिक-मुलांचे वसती गृह बांधकाम व रंगकाम
शाळेत जाणाऱ्या मुलींकरता सायकलीचे वाटप नाशिक जिल्ह्यातील एकूण बारा शाळांमध्ये ५०३मुलींना सायकलींचे वाटप
शिवभक्त नारायण महाराज शिक्षण मंडळ चितेगाव ,जिल्हा नाशिक – शाळेकरीता वर्ग खोल्या बांधणे
डांग सेवा मंडळ, पेठ,जिल्हा नाशिक -१५० मुलींचे वसतिगृह बांधणे
वाहेगाव वाचनालय वाहेगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक -वाचनालयाकरिता कपाट व इतर फर्निचर
महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ, मोडाळे, जिल्हा नाशिक -शाळा बांधण्याकरता मदत
निराधार स्वावलंबन समिती अंबड, नाशिक- नवीन शाळेची बिल्डिंग उभारणे
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तळवाडे, जिल्हा नाशिक- स्वयंपाक गृह बांधणे व भोजनालयास फरशी बसवणे
डांग सेवा मंडळ, सुळे, जिल्हा नाशिक -२०० मुलांकरिता वसतिगृह बांधणे
सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ, मखमलाबाद, नाशिक – शाळा बांधण्यास मदत
लोकमान्य माध्यमिक विद्यालय, भयाळे, जिल्हा नाशिक -शाळेतील जुने छत बदलवून नवे बसविणे
नाशिक हिंदी सभा, सातपूर, नाशिक- सहाशे मुलांकरिता बेंचेस
डांग सेवा मंडळ, वारे, जिल्हा नाशिक- मुलीं करिता वॉशरूम बांधणे
संत ज्ञानेश्वर विद्यालय, वाहेगाव,तालुका चांदवड, जिल्हा नाशिक -उच्च शिक्षणाकरिता वर्ग खोल्या बांधणे
आदर्श माध्यमिक विद्यालय, कोटमगाव जिल्हा नाशिक-सायन्स लॅब बांधणे
कोरोना काळातील मदत -पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स व इतर साहित्य पुरविणे
८०० पेक्षा अधिक लोकांना जीवनावश्यक रेशन साहित्य वाटप
भारतीय जैन संघटना मिशन झिरो करिता मदत
ऑक्सीजन प्लांट अंबड एमआयडीसी ५०० एलपीएम चा ऑक्सिजन प्लांट
श्री गाडगे महाराज धर्मशाळा, नाशिक -जुने मोडकळीस आलेले छत बदलवून नवे बसवणे
यशवंत व्यायाम शाळा, नाशिक – सोलर पावर सिस्टीम बसविणे, ७२ जुडो मॅट पुरविणे