मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी : पोलिसांना पाकिस्तान वरून आला संदेश

0

मुंबई – दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा हादरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी देणारा व्हॉट्सअॅप संदेश मिळाला आहे. पाकिस्तानी नंबरवरून हा मेसेज आल्याचे वृत्त आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली असून एटीएसही तपासात सहभागी झाली आहे.

पाकिस्तानी नंबरवरून आलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘जी मुबारक हो… मुंबईवर हल्ला होणार आहे. 26/11 ची आठवण करून देईल. मुंबई उडवण्याच्या तयारीत आहे.  मुंबई उडवायची आहे. तुमचे काही भारतीय माझ्यासोबत आहेत, ज्यांना मुंबई उडवायची आहे. एकूण ६ जण ही घटना घडवून आणतील.

अजमल कसाबचाही संदेशात उल्लेख 
अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही, तर प्रत्यक्षात येतोय. माझं लोकेशन पाकिस्तानमध्ये दिसेल पण काम मुंबईत चालेल. आमचा काही ठिकाणा नसतो. लोकेशन तुम्हाला दुसऱ्याच देशाचं दसेल. आमचे स्थान तुम्हाला देशाबाहेर दाखवेल. आम्हाला जागा नाही. यामध्ये अजमल कसाबबद्दलही काही गोष्टी लिहिल्या आहेत. यासोबतच उदयपूरच्या कन्हैयालाल हत्येचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये मृतदेह वेगळे करण्याची बाब सांगण्यात आली आहे. याशिवाय सिद्धू मुसेवाला आणि अमेरिकेतील हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.