नावा चषक क्रिकेट स्पर्धांचा आजपासून थरार

क्रिकेट मॅच LIVE बघण्यासाठी खालील LINK वर क्लिक करा : प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसह जनस्थानच्या सेलिब्रिटींचा सहभाग

0

नाशिक-नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्यातर्फे माध्यम क्षेत्रातील माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व सम्राट ग्रूप प्रायोजित ‘नावा प्रिमियर लिग  (एनपीएल) नावा चषक क्रिकेट सामन्यांच्या थरार आजपासून महात्मानगर येथील स्टेडियमवर रंगणार आहेत शनिवार दि ०१ एप्रिल रोजी सकाळी ८ वा सामन्यांना सुरुवात होणार असून, डेन केबलनेटवर्क च्या चॅनेल क्र.१८० वर  तसेच युट्युब वर या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे .जनस्थानच्या सेलिब्रिटींचा सहभाग हे या स्पर्धांचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

                                                                                          जनस्थानच्या सेलिब्रिटीं

स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत.पहिल्या दिवशी  
दिव्य मराठी- पुण्यनगरी , 
सकाळ-देशदुत, 
रेड एफ एम-पुढारी, 
नावा -जनस्थान, 
दिव्य मराठी-टाईम्स ग्रुप ,
देशदुत-लोकमत,
पुढारी-लोकनामा,
जनस्थान- रेडीओ मित,
टाईम्स ग्रुप-पुण्यनगरी या संघांमध्ये लढत होईल .

एन पी एल चे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अ‍ॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वारियर्स व मिडीया  अ‍ॅडव्हर्टायझींग,गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझींग, नवांकुर पब्लिसीटी व पेटूमल समोसेवाले टॉस पार्टनर मयुर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझींग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषीदूत बायो हर्बल, ओेमपुजा इलेक्ट्रॉनीक, वेध न्युज  डेन केबलनेटवर्कचे रोहित आरोळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राऊंड उपलब्ध करून दिले आहे.

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅटसमन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात. मिडिया जगतामध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता असते . स्पर्धा समिती प्रमुख रवि पवार,सचिन गिते व नावा चे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मा सरचिटणीस दिलीप निकम, सरचिटणीस मिलींद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दिपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरेे , सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार व नावाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.

सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा अथवा QR Coad scan करा 

https://youtube.com/live/KtF_ULnSTHo?feature=share

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!