“स्मरण रुपेरी” च्या माध्यमातून प्रोजेक्टर रूममधून अनुभवलेला रंजक प्रवास उलगडणार 

भय्या बोमचे यांच्या “स्मरण रुपेरी” पुस्तकाचे गुरुवारी ३० नोव्हेंबरला प्रकाशन 

0

नाशिक,दि. २८ नोव्हेंबर २०२३ – नाशिक मधील मधुकर-विजयानंद आणि चित्रमंदिर  या चित्रपटगृहात प्रोजेक्टर ॲापरेटर म्हणून काम केलेले  भय्यालाल बोमचे यांच्या “स्मरण रुपेरी” ह्या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता, कुसुमाग्रज स्मारक येथे, ग्रंथ तुमच्या दारी चळवळीचे प्रवर्तक विनायक रानडे यांच्या हस्ते होणार आहे.

१९६७ साली ११ वी एस.एस.सी  पास झालेल्या भय्यालाल बोमचे यांनी शाळेत असतांनापासून आणि आय टी आय शिकून मायको बॅाश मधे नोकरी लागल्यानंतरही, १९८५ सालपर्यंत, मधुकर-विजयानंद आणि चित्रमंदिर  या चित्रपटगृहात प्रोजेक्टर ॲापरेटर म्हणून काम केलंय. मूळच्या जिज्ञासू स्वभावामुळे, अगदी मनापासून त्यांनी अनेक चित्रपट पाहिले आणि दाखवले.पुस्तक लिखाण आणि प्रकाशनासाठी, सी एल कुलकर्णी, यशवंत जोशी, प्रा. डॅा महेश कुलकर्णी, धनंजय गोवर्धन, स्वानंद बेदरकर सर्व वर्गमित्र आणि मुद्रक प्रकाशक अल्टिमेट इंप्रेशनचे बिपीन बाकळे सहकार्य लाभेले आहे.

त्या काळातला प्रोजेक्टर रूममधून अनुभवलेला रंजक लेखाजोखा असलेलं “स्मरण रुपेरी” ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास नाशिककर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.