उड्डाण घेताना तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग : ११३ प्रवासी थोडक्यात बचावले

व्हिडीओ पहा

0

बीजिंग- चीनमधील चाँगकिंग  शहरात गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. येथे तिबेट एअरलाइन्सच्या विमानाने विमानतळावर टेकऑफ दरम्यान मोठी आग लागली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान चाँगकिंग हून तिबेटमधील ल्हासा ला जाणार होते. मात्र, टेकऑफ दरम्यान  विमान घसरल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे  या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

चीनचे अधिकृत वृत्तपत्र पीपल्स डेलीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात ११३ प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमान आगीत जळताना दिसत आहे. मात्र, या घटनेच्या इतर काही फोटोंमध्ये अग्निशमन दलाचे जवान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवताना दिसत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, उड्डाण करण्‍यापूर्वीच विमानातील कर्मचार्‍यांना विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय होता. यानंतर घाईघाईने टेकऑफ थांबवण्यात आले. यादरम्यान विमानाने टेक ऑफ न करता धावपट्टी ओलांडली आणि आग लागली.चीनमध्ये दोन महिन्यांपूर्वीही अशी एक दुर्घटना घडली होती. चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचा विमानाला अपघात होऊन १३२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!