ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today Horoscope in Marathi)
आषाढ कृष्ण दशमी / एकादशी | शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू | दक्षिणायन
“आज वर्ज्य दिवस आहे”
🔭 राहुकाळ – दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६.००
🔭 नक्षत्र – कृतिका / रोहिणी
🔭 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ (गंड योग, विष्टी करण)
(Today Horoscope in Marathi)
🟥 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
चंद्र-रवी-नेपच्यून-शनीच्या शुभ योगामुळे राजकारणात मोठे यश मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. प्रभावी वाणीमुळे महत्त्वाची कामे होतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग.
🟩 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
चंद्र तुमच्याच राशीत. चैनीसाठी खर्च होईल. कलाकारांना मोठ्या संधी मिळतील. वाहनसुख मिळेल. काही दीर्घकालीन निर्णय होतील. पराक्रम गाजवाल.
🟨 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
व्यय स्थानातील चंद्र. आज थोडी विश्रांती घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. पित्याचे महत्त्व जाणवेल. अचानक संकटे टळू शकतात.
🟦 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
ग्रहमान उत्तम. आत्मविश्वास दुणावेल. नवे काम करण्याचा उत्साह निर्माण होईल. पूर्वजांचे पुण्य लाभेल. अचानक लाभाचे योग. पर्यटनाचा योग आहे.
🟧 सिंह (मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टू, टे):
नेतृत्व गुणांनी यश मिळेल. मात्र शनी आणि रवी यांची नाराजी. संयम ठेवा. सूर्य उपासनेचा लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ शक्य.
🟩 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
नवम स्थानातील चंद्र. सुखद अनुभव येतील. आर्थिक वाढ, हरवलेली वस्तू सापडेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
🟨 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
संमिश्र ग्रहमान. अष्टमस्थानी चंद्र व हर्षल. कामात उत्तम सहकार्य. स्वतःची काळजी घ्या. वरिष्ठ अधिकारी खूश राहतील.
🟥 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
वडिलांचा आशीर्वाद लाभेल. छोटी सहल घडेल. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. न्यायभावनेने वागाल.
🟦 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
व्यवसायात लाभ. प्रवास घडतील. संवाद सकारात्मक. आरोग्यात सुधारणा. जमीन व्यवहारात यश.
🟧 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
शेती आणि अन्नधान्य लाभदायक. लॉटरीतून यश शक्य. गैरसमज दूर होतील. चांगल्या कर्माचा दिवस.
🟨 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
बुद्धी असूनही व्यावहारिकतेचा अभाव जाणवेल. मनात द्विधा. घराकडे ओढा. बोलण्याचा प्रभाव पडेल. जंगल प्रवासात काळजी घ्या.
🟩 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
अध्यात्मात यश. अचूक भाकीत कराल. नियोजनात अचूकता. सौख्य आणि व्यवसायात वाढ. लेखकांना उत्तम संधी.
२० जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐(Today Horoscope in Marathi)
तुमच्यावर चंद्र नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे मैत्रपरिवार मोठे असते. विरुद्ध लिंगी श्रीमंत व्यक्ती पासून फायदा होतो. तुमचा भाग्योदय पाण्याजवळ होतो. तेव्हा शक्यतो समुद्र ,नदी तलाव या ठिकाणी वास्तव्य करायचा प्रयत्न करावा म्हणजे भरभराट होईल. लोक कल्याणासाठी नवीन योजना विचार सतत चालू असतात .लेखनाची आवड असते ,लेखक म्हणून प्रसिद्ध होऊ शकता.तुम्ही ममताळू व सहृदयी आहात .मदतीसाठी सतत हात पुढे करता. जीवनामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचे त्याबद्दल तुम्ही खूप मोठमोठी स्वप्न रंगवता. प्रत्येक कामाबद्दल उत्साही असतात. क्वचित प्रसंगी इतरांनी आपल्या मताचे अनुकरण करावे अशी अपेक्षा करता. ज्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल असे प्रसंग तुम्ही स्वतःच निर्माण करता व त्यामध्ये तुम्ही नायिकेची भूमिका बजावता. जीवनामध्ये त्याच त्याच गोष्टी करायला तुम्हाला आवडत नाही. स्वतःच्या स्वप्नामध्ये रंगण्यात अधिक आनंद मिळतो. त्यामुळे बऱ्याच वेळा एककल्ली जिवन जगता. तुमच्यातल्या उदारपणामुळे इतरांना तुम्ही प्रिय असत. बराच वेळा इतरांना नाराज करणे तुम्हाला कठीण जाते. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही उत्तम तऱ्हेने प्रत्यक्षात रूपांतर करता. रम्य विषयाशी समरस होण्याची वृत्ती असते. निसर्ग सौंदर्य समुद्र वगैरे गोष्टींशी एकरूप होणे तुम्हाला प्रिय असते. आकाशाकडे किंवा समुद्राच्या लाटांकडे बघायला फार आवडते. काही प्रमाणात भित्रा स्वभाव असून मवाळ दुसऱ्यांच्या दबावाला बळी पडतात .तुम्ही अतिशय अस्वस्थ असून सतत बदल करण्याची आवड असते. आळशीपणा असतो त्यामुळे श्रम करण्याची क्षमता कमी असते. अस्थिर स्वभावामुळे संपत्ती स्थैर्य सहजासहजी मिळवा मिळत नाही. त्यामुळे उतार वयात आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागते. बचतीकडे लक्ष देणे आर्थिक बाजू बळकट करणे गरजेचे आहे. तुम्ही अतिशय प्रेमळ व निष्ठावान असतात. दुसऱ्यांबद्दल आदर व आपुलकी असते. पतीकडून फारशी अपेक्षा नसते, जे मिळेल त्यात तुम्ही सुखी समाधानी असतात. तुम्ही उत्तम असून मुलांमध्ये व संसारात रमता. तुमच्या अस्तित्वामुळे घरामध्ये आनंदाचे व समाधान त्यांचे वातावरण असते .तुम्हाला अंतःस्फूर्तीची देणगी असल्याने काही वेळेला पतीलाही त्याच्या व्यवसायात त मार्गदर्शन करतात. काही वेळेला बरोबरीचा किंवा वयाने लहान पती निवडता.
शुभ रंग:- पांढरा, निळा किंवा क्रीम
शुभ दिवस:- सोमवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रत्न :- मोती, हिरा चंद्रमणी किंवा गोमेद.
💫 विशेष टीप:
तुमचं नाव, जन्मतारीख, आणि वेळ यावरूनच अचूक राशी ठरते. नावावरून राशी ठरवणं हे अंदाजे असते. सविस्तर कुंडली आणि राशी समजून घेण्यासाठी संपर्क साधा.
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
🔮 कुंडली विश्लेषण, रत्न, विवाह योग, व्यवसाय सल्ला
