आजचा रंग : मोरपंखी
नवमी – २३ ऑक्टोबर सोमवार – सिद्धीदात्री – मोरपंखी – हा रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं.

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
वाचकांचे मनस्वी धन्यवाद.
जनस्थान ऑनलाईनच्या या उपक्रमाला महाराष्ट्रासह सर्वदूरहुन प्रतिसाद दिल्या बद्दल आपले मनस्वी धन्यवाद ऑनलाईन दैनिक असल्याने काही बंधने असल्याने सर्वांचे फोटो रोज घेणे शक्य नव्हते. तरी जास्तीत जास्त फोटो घेण्याचे प्रयत्न केले. असाच कायम प्रतिसाद आणि आपले आशीर्वाद असू द्या.
विशेष आभार
अभिनेत्री पल्लवी पटवर्धन,रुपाली पवार,प्रांजली बिरारी-नेवासकर ,पूजा गोरे-वर्तक,ऋतुजा बागवे,नुपूर सावजी,पल्लवी वैद्य,विद्या करंजीकर
आपला
अभय ओझरकर
संचालक संपादक
जनस्थान ऑनलाईन
९८९०३७७२७४










माया बनकर, सीमा तडवी, नलिनी जाधव,सुरेखा जाधव, मनिषा वाघ, अनिता भगत, गायत्री कुमावत

मात्र या साड्याच्या
रंगापेक्षा आपल्या स्वकर्तृत्वाने विविध प्रकारच्या क्षेत्रात स्वतःच्या नावलौकिकाचे रंग मुक्तपणे उधळणाऱ्या अनेक महिला विविध प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.आज यांनी कोणत्या रंगाची साडी परिधान केली हे महत्वाचे नसून आपल्या क्षेत्रात दिलेले योगदान लाखमोलाचे आहे….
या महीला आहेत एस टी विभागीय कार्यशाळा, पेठ रोड येथील….महिलांनी आज सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. याला याला एसटी महामंडळही अपवाद राहिले नाही. पेठरोड येथील विभागीय विभागीय कार्यशाळेत आयोजित खंडनवमीप्रसंगी पूजन करतांना महिला कर्मचारी…..
(छाया_किरण घायदार, नाशिक)