ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ कृष्ण त्रयोदशी/ चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज त्रयोदशी वर्ज्य दिवस *शिवरात्री*
चंद्र नक्षत्र – कृतिका (दुपारी ३.०७ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- चंद्राचा बुध आणि शुक्र शी शुभ योग आहे. कलाकारांना उत्तम लाभ होतील.विक्री व्यावसायिकांना यश मिळेल.वाहन सुख लाभेल.
वृषभ:- बौद्धिक चमक दाखवाल. महिलांना एखादा दागिना मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मात्र मन लागणार नाही.
मिथुन:- मनापासून खर्च कराल. वस्तू दुरुस्तीची वेळ येईल. कलाकारांना यश मिळेल. अर्थलाभ होईल. प्रवासात अडथळे.
कर्क:- उत्तम आणि प्रणयरम्य दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल. स्वप्ने साकार होतील.
सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. इतरांसाठी मेजवानी वर खर्च कराल. पत्नीची नाराजी ओढवून घ्याल.
कन्या:- प्रवासाचे बेत आखाल. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. मनासारखा दिवस व्यतीत होईल.
तुळ:- ज्योतिष विद्येची मदत घ्याल. तीर्थयात्रा घडेल. विश्रांतीची गरज भासेल.
वृश्चिक:- विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील. प्रेमात यश मिळेल. जल पर्यटन घडेल.
धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील. गुंतवणूक कामी येईल. गृहकलह होऊ शकतो.
मकर:- आज आनंदी दिवस आहे. हास्यविनोद घडतील. छोटी सहल कराल. प्रतिष्ठा पणाला लागेल.
कुंभ:- सत्य वचन कामी येईल. चलाखपणा जाणवेल. पशुधन वाढेल. शेतीतून यश.
मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. मधुर वाणीने सर्वांची मने जिकून घ्याल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
