ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल चतुर्थी. ग्रीष्म ऋतू उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस , *विनायकी चतुर्थी* आहे. ” आज ‘वृद्धी योग आहे’
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (संध्याकाळी ७.०५ पर्यंत) चंद्र दुपारी १२.२० पर्यंत मिथुन राशीत आहे. नंतर कर्क राशीत प्रवेश. चंद्र – लाभ – बुध.
चंद्र – त्रिकोण – नेपच्यून. (टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- प्रगतीसाठी पोषक कालावधी आहे. वेळ दवडू नका. कामे मार्गी लागतील.
वृषभ: प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसायात वाढ होईल. छंद जोपासना होईल.
मिथुन:- मेजवानी मिळेल. आनंदात दिवस व्यतीत होईल. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.
कर्क:-संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. सकाळी महत्वाची कामे नकोत.
सिंह:-उत्तम ग्रहमान आहे. यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. सकाळी कामे पूर्ण करा. संध्याकाळ विश्रांतीची.
कन्या:-आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. व्यवसायात यश मिळेल. संशोधन कार्यात यश मिळेल.
तुळ:- सौख्य लाभेल. प्रवास संभवतात. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल.
वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.
धनु:- प्रेमात यश मिळेल. प्रवासातून लाभ होतील. दुपार नंतर महत्वाची कामे नकोत.
मकर:-यशदायी कालावधी आहे. दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील.
कुंभ:-अनुकूल दिवस आहे. दुपार नंतर सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मीन:-जागा खरेदी विक्री होईल. शेतीतून लाभ होतील. संवाद साधून मने जिंकाल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
