ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण अमावस्या/भाद्रपद शुक्ल प्रतिपदा.वर्षा ऋतू,दक्षिणायन,शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस. चंद्र नक्षत्र -उत्तरा (फाल्गुनी).
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धाडसी स्वभाव उफाळून येईल. त्यातून लाभ होतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून फायदा होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) घरात काही मोठे बदल संभवतात. जेष्ठ व्यक्तीचा मोलाचा सल्ला मिळेल. खर्च वाढतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पूर्वार्ध अत्यंत अनुकूल आहे. कामे उरकून घ्या. अचानक मोठे लाभ मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कौटुंबीक सुख लाभेल. धन प्राप्ती होईल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. जल पर्यटन घडेल. गुरू सन्निध लाभेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुरुवात काहीशी संथ होईल. उत्तरार्ध अनुकूल आहे. नवीन संधी चालून येतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे पूर्ण करा. भागीदारी व्यवसाय यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चांगला दिवस आहे. नोकरीत दबदबा वाढेल. तुमचे विचार इतरांना पटतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. ऐश्वर्य लाभेल. खनिज संपत्तीतून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तरार्ध उत्तम आहे. कीर्ती लाभेल. वाटचाल जोरदार होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी कामे पूर्ण करा. यश मिल. उत्तरार्ध संथ आणि चिंता वाढवणारा आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. काळजी दूर होईल. तुमचे गुणगान होईल.
(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
