✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Today’s Horoscope in marathi
📅 दिनविशेष-आज वर्ज्य दिवस! पण काही राशींना मिळणार सुखद अनुभव -जाणून घ्या बुधवार, ११ जून २०२५ चे संपूर्ण राशिभविष्य!
तिथी: ज्येष्ठ पौर्णिमा/प्रतिपदा
चंद्र नक्षत्र: ज्येष्ठा
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/धनु.
राहुकाळ: दुपारी १२:०० ते १:३०
📛 आजचा दिवस वर्ज्य आहे – कोणत्याही नव्या कामाची सुरुवात, खरेदी किंवा करार टाळणे लाभदायक ठरेल.
🔮 १२ राशींचं संक्षिप्त राशीभविष्य (Today’s Horoscope in marathi)
♈ मेष
मानसिक तणाव, सरकारी कामात विलंब. टिप: शेअर्समध्ये लाभ शक्य, पण विचारपूर्वक गुंतवणूक करा.
♉ वृषभ
स्पर्धा जाणवेल, पण जोडीदाराचा पाठिंबा लाभदायक. टिप: वादांपासून दूर रहा.
♊ मिथुन
पैसे, प्रतिष्ठा आणि सन्मान — सर्व मिळण्याची शक्यता! टिप: आहारावर लक्ष ठेवा.
♋ कर्क
कठोर बोलणे आवश्यक पण मर्यादेत. टिप: कुलदेवतेची प्रार्थना करा.
♌ सिंह
तणाव दूर होईल, कामात वरिष्ठांची मर्जी राखा. टिप: घरात सकारात्मक उर्जा निर्माण करा.
♍ कन्या
बौद्धिक कौशल्यामुळे नाव मिळेल. टिप: वडिलांचा सल्ला अमूल्य ठरेल.
♎ तुळ
प्रवास लाभदायक, पण प्रशासकीय अडचणी संभवतात. टिप: संगणकीय ज्ञानाचा उपयोग करा.
♏ वृश्चिक
चंद्र आपल्या राशीत. आत्मविश्वास आणि मनःशांती वाढेल. टिप: स्वतःवर विश्वास ठेवा.
♐ धनु
अनपेक्षित लाभ, पण खर्च वाढू शकतो. टिप: आरोग्याची काळजी घ्या.
♑ मकर
कामासाठी आजचा दिवस उत्तम. टिप: जोडीदाराचा सल्ला ऐका.
♒ कुंभ
नोकरी-व्यवसायात यश, घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. टिप: संध्याकाळी वाद जिंकण्याची शक्यता.
♓ मीन
व्यवसायात भरभराट. टिप: प्रवास घडतील, नवे संधी मिळतील.
🧘♂️ ज्योतिष टिप्स (Astro Tips):
आज व्रत/उपवास ठेवल्यास मानसिक शांतता मिळेल.
कुलदेवतेची उपासना विशेष फलदायी.
ज्येष्ठा नक्षत्र असल्याने स्त्रियांनी सोन्याचे अलंकार वापरणे शुभ.
लाल वस्त्र धारण केल्यास नकारात्मकता दूर होईल.
११ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. तुम्ही संवेदनशील आहात. तुम्हाला लोट्रो/कोडे सोडवणे यांचा नाद बसतो. तुम्ही कष्टळू, शांत आहात मात्र तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, सूत्रसंचालन यात तुम्हाला रस असतो. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाणा आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. तुमची अनाठायी काळजी करणे सोडले पाहिजे.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली परीक्षण व विशेष मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521

[…] – मंगेश पंचाक्षरी, नाशिक Today’s Rashi Bhavishya Marathi 🧘♂️ पंचांग माहिती तिथी: ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी चंद्र […]