आजचे राशिभविष्य सोमवार,२१ एप्रिल २०२५  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

चैत्र कृष्ण अष्टमी/नवमी. शके १९४६, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
“आज उत्तम दिवस आहे” *काळाष्टमी*  
नक्षत्र – उ. षा./(दुपारी १२.३७ नंतर) श्रवण.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र प्रतियुती मंगळ, रवीशी केंद्र योग तर बुधाशी लाभ योग आहे. वक्तृत्व चमकेल. विक्री व्यवसायात यश मिळेल. मात्र वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सरकारी नियम कसोशीने पाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल.  अनपेक्षित लाभ होतील. नात्यात मतभेद संभवतात.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. चैनीवर खर्च कराल. बोलताना काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. सन्मान होतील. व्यवसाय आणि नोकरीत नैतिकता सोडू नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ स्थानात चंद्र आहे.  कामाचा ताण वाढेल. व्यवसायात यश मिळेल. सन्मान मिळतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्ती सोबत वेळ व्यतीत कराल. सहल घडेल. विनाकारण वाद वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी कटकटीं निर्माण होऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यस्त व्हाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन खरेदी होईल. अडचणीतून मार्ग सापडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र उत्तम अर्थ लाभ मिळवून देतील. व्यावसायिक यश लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कोर्ट कामात मात्र निराशा होऊ शकते. शत्रू पीडा जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल. शेतीची कामे मार्गी लागतील. खर्च वाढतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळेल. नात्यातून शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील. कोर्ट कामात अपेक्षित यश मिळनार नाही.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. आरोग्य विषयक कामांत वेळ जाईल. अनुकूल रवी, मंगळ आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करवतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल चंद्र आहे. मौज कराल. प्रवास घडतील. मनासारखा दिवस व्यतीत होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!