ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल चतुर्थी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे. दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- व्यवसाय वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. स्पष्ट भूमिका घ्याल. विरोधकांना सडेतोड उत्तर द्याल.
वृषभ:- अकल्पित धनलाभ होईल. मनासारखी कामे पार पडतील. शुभ समाचार येऊ शकतात.
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. विनाकारण त्रास होऊ शकतो. काही चांगले समाचार समजतील.
कर्क:- प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. प्रसन्न वाटेल. आवडत्या कामात वेळ जाणार आहे.
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात वाढ होईल.
कन्या:- मुलांशी संवाद साधा. दीर्घकालीन नफ्याचे निर्णय होतील. शेअर्स मधून लाभ संभवतात.
तुळ:- शेतीची कामे मार्गी लागतील. राजकीय यश मिळेल. शरीराला विश्रांतीची गरज आहे. आवडते छंद जोपासाल.
वृश्चिक:- दिवस आनंदात जाईल. आर्थिक उन्नती होईल. कुटुंबाला वेळ द्याल. धार्मिक करायचा सहभागी व्हाल.
धनु:- सर्वच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. काळजी दूर होईल. सखोल चिंतन कराल.
मकर:- स्वप्ने साकार होतील. नवीन कल्पना सुचतील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:- फारशी अनुकूलता नाही. कठोर बोलने टाळा. गैरसमज होऊ देऊ नका. काळजी घ्या. एखादा चांगला समाचार येईल.
मीन:- आर्थिक आवक वाढेल. प्रसन्न दिवस आहे. महत्वाचे करार पूर्ण करा. वेळ दवडू नका. जास्तीत जास्त लाभ घ्या.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)