आजचे राशिभविष्य सोमवार, १ मे २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल एकादशी. वसंत ऋतू, शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“सकाळी ९.०० पार्यंत चांगला दिवस” *मोहिनी एकादशी, महाराष्ट्र दिन* 
चंद्र नक्षत्र – पूर्वा (फाल्गुना). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नात्यातून लाभ होईल. बुद्धीपेक्षा आत्म्याचा विचार कराल. अकल्पित सुखद अनुभव येईल. मात्र कलाकारांना कमी अनुकूलता आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर बोलणे होईल. पाणथळ जागी लाभ होतील. खर्चात वाढ संभवते. मान अपमानाचे प्रसंग येतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास वाढेल. मन स्थिर होईल. चैनीवर खर्च कराल. संवादातून अनुकूलता वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभ होतील. मौज कराल.  घरात शांतता राखा. संकटाची तीव्रता कमी होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नवीन मित्र मिळतील. त्यातून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज आराम करणे हिताचे आहे. वरिष्ठ अधिक जबाबदारी सोपवतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. मौल्यवान वस्तू सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उद्योग व्यवसायात वाढ होईल. नात्यातून लाभ होतील. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. भागीदारीत यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकारी मान्यता मिळेल. पत्नीची मर्जी संपादन करावी लागेल. अचानक धनलाभ होईल. वाहन जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवीन कल्पना सुचतील. अकल्पित धनलाभ होईल. कुलदेवतेची उपासना करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिष्ठा सांभाळली जाईल. राजकीय क्षेत्रात संयम ठेवावा लागेल. प्रेमात अपयश येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) राजकीय लेखन होईल. कर्तृत्व चमकून उठेल. पराक्रमी दिवस आहे. घरात मात्र कुरबुरी होऊ शकतात. वाहनांची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) घरात दबदबा वाढेल. खनिज, शेती यातून लाभ होतील. घशाचे विकार संभवतात.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!