आजचे राशिभविष्य सोमवार,२८ नोव्हेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र उत्तराषाढा नक्षत्रात आहे. *नागपूजन – नागदिवे, अमृत सकाळी १०.२९ नंतर, घबाड दुपारी १.३६ नंतर
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:- कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण असेल. कामाचा फारसा ताण येणार नाही. व्यवसाय वृद्धी होईल. नवीन ओळखी होतील.
वृषभ:- सूचक स्वप्ने पडतील. अज्ञात व्यक्तीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो. शुभ समाचार येऊ शकतात.
मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल मात्र लवकरच परिस्थिती बदलेल.आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. विनाकारण त्रास होऊ शकतो.
कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. दिवस आनंदात जाईल. मिश्किल स्वभावाचा लाभ मिळेल. चर्चेने प्रश्न सुटतील. मान्यता मिळेल.
सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. नवीन कामे येतील. अकल्पित घटना घडतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. उच्च शिक्षणात यश मिळेल.
कन्या:- मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल. नवीन कल्पना सुचतील. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष नको. शेअर्स मधून लाभ संभवतात.
तुळ:- शेतीची कामे मार्गी लागतील. राजकीय यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल. तब्येत सांभाळा. शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराशी मतभेद नकोत.
वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक उन्नती होईल. वैद्यकीय मदत लागेल. विंचू काट्याचे भय आहे.
धनु:- संतती ची काळजी वाटेल. भलते धाडस नको. कायदेशीर कामात काळजी घ्या. चूक होऊ देऊ नका. कलाकारांना यश मिळेल.
मकर:- आनंददायी कालावधी आहे. कोर्ट कामात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:- फारशी अनुकूलता नाही. संवेदनशीलता वाढेल. भावनांचा कल्लोळ होईल. आत्ममग्न व्हाल. मोजके बोला. भावंडांची काळजी वाटेल.
मीन:- आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे. महत्वाचे करार पूर्ण करा. बोलताना काळजी घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.