आजचे राशिभविष्य शनिवार,९ एप्रिल २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल अष्टमी. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे” *दुर्गाष्टमी* अतिगंड योग सकाळी ११.२४ पर्यंत. नंतर सुकर्मा योग आहे.
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. मनःशांती लाभेल. आरोग्य संभाळा. सरकारी कायदे पाळा. चालढकल नको.
वृषभ:- डोळ्यांची काळजी घ्या. उष्णतेचा त्रास होऊ शकतो. निर्णय अचूक घ्या. बोलणे कमी.
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. काळजीपूर्वक नियोजन करा. दिवसाचा उत्तरार्ध कलागुणांना प्रोत्साहन देणारा आहे.अध्यात्मिक लाभ होतील.
कर्क:-  विचारपूर्वक निर्णय घ्या. मनाचा समतोल ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. नात्यातून त्रास संभवतो.
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. योग्य नियोजन करा.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आत्मविश्वास कमी होईल. मात्र व्यवसायात यश मिळेल. बौद्धिक क्षेत्रात अधिक काळजी घ्या.
तुळ:- वरिष्ठांची मर्जी संभाळा. दिवस संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. काही चांगला घटना घडतील.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घ्या. सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. कोर्टात अपयश येऊ शकते.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. कीर्ती पसरेल. अहंकार मात्र टाळला पाहिजे.
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. हट्टीपणा नको.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य मिळेल. सत्संग लाभेल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. मैत्री वाढीस लागेल.
मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. धावपळ वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन दोलायमान होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.