ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी, उत्तरायण, शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस, *वटपौर्णिमा* आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- दबदबा वाढेल. वाहन सुख लाभेल. नवीन खरेदी होईल. काही बाबतीत मात्र अपेक्षाभंग होईल.
वृषभ:- भावंड मदत करतील. प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शत्रू पराभूत होतील. यशस्वी व्हाल.
मिथुन:- आर्थिक प्रगतीसाठी उत्तम दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल. प्रवास घडतील.
कर्क:- पराक्रम गाजवाल. निर्णय अचूक ठरतील. मन आनंदी राहील. प्रणयरम्य दिवस आहे.
सिंह:- आवडत्या छंदासाठी खर्च कराल. मेजवानी घडेल. वाहन जपून चालवावे. पत्नीशी/ जोडीदाराशी मतभेद संभवतात.
कन्या:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. आर्थिक प्रगती मनासारखी होईल. स्वप्न साकार होतील. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
तुळ:- शब्दास मान मिळेल. मन आनंदी राहील. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. मौज कराल. गृहकलह मात्र टाळा.
धनु:- संमिश्र दिवस आहे. ऊन पावसाचा खेळ जाणवेल. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च होईल.
मकर:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रणयरम्य कालावधी आहे. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश.
कुंभ:- कामाचा ताण वाढेल. दगदग होईल मात्र आर्थिक लाभ होतील. वाहन जपून चालवा. कनिष्ठ सहकाऱ्याकडून सुखद अनुभव येईल.
मीन:- उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील प्रेमात यश मिळेल. चातुर्य कामास येईल. स्वप्ने साकार होतील. दूरच्या प्रवासात त्रास.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
