ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल नवमी/दशमी शिशिरऋतू
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अत्यन्त अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मोठे लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. व्यवसाय वृद्धी होईल.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. आध्यत्मिक लाभ होतील. दूरचे प्रवास संभवतात. उच्च शिक्षणासाठी दूर जाणे होईल. सूचक घटना घडतील.
कर्क:- प्रतिकूल दिवस आहे. कामात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत. अधार्मिक कृत्ये घडू देऊ नका.
सिंह:- दिवस अनुकूल आहे. व्यावसायीक वाढ होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल. शुभ समाचार समजतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. नात्यातूनलाभ होतील. जेष्ठ व्यक्तींकडून फायदा होईल. सौख्य लाभेल. मनासारखी बढती/बदली होईल.
तुळ:- उच्च शिक्षणात यश मिळेल शेर्स मधून लाभ संभवतात. कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. नात्यातून लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीशी संवाद साधा.
वृश्चिक:– धातू विक्रीतून लाभ होतील. वास्तू संबंधित महत्वाचा निर्णय होईल. वाहन सुख लाभेल. खरेदी होईल. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- आज महत्वाचे करार नकोत. दगदग वाढेल. वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा. घरात कुरबुरी होऊ शकतात.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. सौख्य लाभेल.
कुंभ:- संतती कडून शुभ समाचार समजतील. जप लाभदायक ठरेल. अध्यात्मिक उन्नती होईल. चिंता दूर होतील.
मीन:- संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा. विश्रांती घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)