आजचे राशिभविष्य शनिवार, १९ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण प्रथमा. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“चांगला दिवस *वसंतोत्सव आरंभ, अभ्यंगस्नान, आम्र कुसुम प्राशन* आहे”
चंद्रनक्षत्र: हस्त
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्वप्ने साकार होतील. कार्य सिद्धीस जाईल. उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अत्यंत अनुकूल वातावरण आहे. संधीचा लाभ घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवण्याची चांगला कालावधी आहे. मनासारखी कामे होतील. संतती संबंधीत शुभ समाचार समजतील. शिक्षणात यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल. गुंतवणुकीतुन चांगले लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील. स्वप्न साकार होतील प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कलाकारांना यश मिळेल राजकारणात गती येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. भौतिक सुखे मिळतील. मन आनंदी राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कार्य सिद्धीस जाईल. छोटे प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील. विरोधक पराभूत होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. घरात वादविवाद टाळा. जमीन संबधित कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील. अडचणी दूर होतील. वेळचा सदुपयोग करा. बराच काळ रखडलेले काम पुढे सरकेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. वरिष्ठ खुश होतील. नोकरीत प्रगती होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल. स्पष्ट भूमिका घेतल्यास चांगले लाभ होतील. आर्थिक तजवीज होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घेणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम ठेवा. दगदग टाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कामे मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल. विवाह जुळून येण्याचे योग आहेत. योग्य विचार करून  भूमिका घ्याल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.