ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण प्रतिपदा. वसंत ऋतू, शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
वर्ज्य दिवस. चंद्र नक्षत्र – विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- आजचा दिवस संमिश्र आहे. मेव्हण्या कडून लाभ होतील. संध्याकाळी मेजवानीचा बेत आखाल.
वृषभ:- धनवृद्धी होईल. दबदबा वाढेल. पाणथळ जागी भाग्योदय होईल.
मिथुन:- कल्पना विस्तार चांगला होईल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल.
कर्क:- योग्य कारणासाठी खर्च होईल. नातेवाईकांशी संवाद होईल. जल प्रवास घडेल.
सिंह:- पूर्वार्ध चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. दबदबा वाढेल. व्यसने टाळा.
कन्या:– कामाच्या ठिकाणी योग्य सहकार्य मिळेल. मित्र मंडळी आणि कुटुंब यांचे संयुक्त संमलेन होईल. जोडीदार खुश राहील.
तुळ:- लक्ष्मी प्रसन्न राहील. वेळ दवडू नका. प्रवास घडतील. सहकारी मदत करतील.
वृश्चिक:- उत्तरार्ध चांगला आहे. स्त्रीधन वाढेल. कोर्ट कामात यश मिळेल. छोट्या प्रवासाबाबत शुभ समाचार समजतील.
धनु:- पत्नीकडून विशेष लाभ होतील. सल्ला मोलाचा ठरेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. घरात मोठे बदल कराल.
मकर:- उत्तरार्ध उत्तम आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल. शत्रू उघडे पडतील.
कुंभ:– पूर्वार्धात मंत्र सिद्धी होईल. गूढ अनुभव येतील. उत्तरार्ध वक्तृत्व गाजवणारा आणि कुटुंबास वेळ देणारा आहे.
मीन:– घरातील रखडलेली कामे आज मार्गी लावा. लाभदायक ठरेल. चमत्कारिक मानसिक अनुभव येतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
