आजचे राशिभविष्य रविवार,१३ एप्रिल २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 
चैत्र कृष्ण प्रतिपदा. विश्वावसुनाम संवत्सर  
राहुकाळ – दुपारी ४.३० ते दुपारी ६.००
“आज वृद्धीतिथी आहे” 
नक्षत्र: चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या/ (सकाळी ७.३९ नंतर) तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात संथ आहे. व्यवसाय वाढेल. मात्र खर्च वाढतील. मन अस्वस्थ राहील. शत्रूचा त्रास जाणवेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) उद्योग व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दूरचे प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बोलताना काळजी घ्या. कोणासही जामीन राहू नका. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सरकारी नियमाचे काटेकोर पालन करा. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसाय वाढेल. नेहमीची कामे चालू ठेवा. चुकीच्या निर्णयामुळे खर्च वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचे नियोजन बदलेल. संयम ठेवावा लागेल. नवीन संधी चालून येतील. आरोग्य तपासणी करणे हिताचे ठरेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र नंतर काही चांगल्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) काहीसा अनुकूल दिवस आहे. सामाजिक कार्यातून विनाकारण त्रास होऊ शकतो. राजकीय भाष्य टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी वेगवान नसली तरी उत्तरार्ध अनुकूल आहे. मात्र आजचा दिवस खर्चात टाकणारा असणार आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाचा पसारा वाढेल. अचानक एखादे नवीन काम अंगावर येऊ शकते. वादविवाद संभवतात.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अडचणी दूर होऊ लागतील. अभ्यासात यश मिळेल. प्रवास घडतील. मंगळाची अनुकूलता असली तरी आज अपेक्षित लाभ मिळणार नाहीत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाची सुरुवात आशादायक आहे. कामे मार्गी लागतील. अष्टम स्थानी चंद्र आहे. विनाकारण खर्च वाढतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!