ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल द्वितीया. वसंतऋतू.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (दुपारी १२.३७ पर्यंत) सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे. *शंकर पर्वतीस दवणा वाहणे.*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-असंबद्ध घटना घडू शकतात. चूकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. पुरेसा आराम करा. व्यसने प्रलोभने टाळा.
वृषभ:- महत्वाची कामे आज नकोत. मन शांत ठेवा. ध्यानधारणा करा. शत्रूंचा त्रास जाणवेल. आज विश्रांती घ्या.
मिथुन:-व्यवसाय वृद्धी होईल. येणी वसूल होतील. मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. लाभ होतील.
कर्क:- वरिष्ठ चमत्कारिक वागतील. मानसिक गोंधळ उडेल. संमिश्र दिवस आहे. व्यसने त्रासदायक ठरतील. उपासना करा.
सिंह:-सरकारी कायदे कसोशीने पाळा.जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. संवाद साधा. सूचक स्वप्ने पडतील.
कन्या:-वाहन जपून चालवा. अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होऊ शकते.
तुळ:- घरात वितुष्ट निर्माण होऊ शकते. भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. भ्रमंती होईल.
वृश्चिक:-मन आनंदी राहील. उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:-धाडसी निर्णय घ्याल. सौख्य लाभेल. नियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील. लाभ होतील.
मकर:-जमीन संबंधित कामे रेंगाळतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. उपासना करा.
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. सूचक घटना घडतील.
मीन:- जुने शत्रू डोके वर काढतील. प्रलोभने टाळा. विंचू काट्याचे भय आहे. खर्चात वाढ संभवते.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)