आजचे राशिभविष्य रविवार, १८ डिसेंबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण दशमी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – हस्त
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर अधिकार गाजवाल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शब्द जपून द्या.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे.उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी आनंददायक अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.
मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.
कर्क:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.
सिंह:- कठोर बोलणे टाळा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. धनलाभ होईल. मात्र शत्रु भय जाणवेल.
कन्या:-प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. जोडीदाराशी किंवा भागीदाराशी वाद नकोत.
तुळ:-  खर्चात वाढ होऊ शकते. पर्यटन होईल. वाहन खरेदी होऊ शकते. अधिकाराचा योग्य वापर कराल.
वृश्चिक:-उत्तम दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. वाहन सुख मिळेल. प्रवास घडतील.
धनु:- अधिकाराचा लाभ मिळेल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील. पशु लाभ होईल.
मकर:-शत्रु भय जाणवेल मात्र तुमची सरशी होईल. स्पर्धेत यश मिळेल. वादविवाद टाळा. कमी बोलणे हिताचे आहे.
कुंभ:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. जुनाट दुखणी डोके वर काढतील. काळजी घ्या.
मीन:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. चांगली बातमी समजेल कोर्ट कामात यश मिळेल..

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!