आजचे राशिभविष्य रविवार,३ जुलै २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल चतुर्थी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस,
विनायक चतुर्थी, आज ‘वज्र’ योग दुपारी १२.०५ पर्यंत त्यानंतर ‘सिद्धी योग आहे”
चंद्र नक्षत्र – आश्लेषा नक्षत्र सकाळी ६.३० पर्यंत आहे त्यानंतर ‘मघा’
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विंचू काट्यापासून सावध रहा. कामात अडथळे निर्माण होतील.काळजीपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. स्वजनांशी वैर निर्माण होऊ शकते. संयमाने घ्या.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन नफा होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील.मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दुपारनंतर अनुकूलता नाही. विंचू काट्याचे भय आहे.वाहने जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मान मरातब वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. उत्तम कालावधी आहे.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिक काम करावे लागेल. उद्योग व्यवसायात अचानक काही समस्या येऊ शकते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील.अकल्पित धन प्राप्त होऊ शकते.गूढ स्वप्ने पडतील.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. पाण्यापासून सावध रहा.भलते साहस नको.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मत्सर त्रास जाणवेल. धावपळ होईल. जोडीदार योग्य सल्ला देईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.